मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) कोकणामध्ये भाजपाचे नेते तथा केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे व खासदार विनायक राऊत यांच्यातील शीत युद्ध काही केल्याने थांबायला तयार नाही. काल खासदार विनायक राऊत यांनी फेसबुकला पोस्ट टाकून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आव्हान दिले आहे की,हिम्मत असेल तर नारायण राणे यांनी वैभव नाईक यांच्या विरोधात निवडणुकीला उभे राहून दाखवावे त्यांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही असे म्हटले आहे. या पोस्ट मुळे सिंधुदुर्गात शिवसैनिक आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे समर्थक भाजपामध्ये देखील शीतयुद्धाला सुरुवात झाली आहे.
काय झालं होतं 2014 च्या कुडाळ विधानसभा निवडणुकीमध्ये
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा 2014 मध्ये वैभव नाईक यांनी दहा हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. तेव्हापासून आ.वैभव नाईक हे जायंट किलर म्हणून राज्यात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विजयापेक्षा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पराभवाची चर्चा राज्यात त्यावेळी चर्चिली गेली होती. २०१४ साली शिवसेना भाजप एकत्र होती तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे काँग्रेस कडून त्यावेळी लढले होते आणि त्यामध्ये नारायण राणे यांचा धक्कादायक पराभव झाला होता तेव्हापासून वैभव नाईक हे राज्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे विरोधक म्हणून प्रसिद्ध झाले