मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) महाराष्ट्राचे माजी शालेय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री यांना केंद्रात भाजपाच्या सरचिटणीसपदी बढती देण्यात आली आहे. त्यामुळे माजी मंत्री विनोद तावडे यांना संयमाचे फळ मिळाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

यापूर्वी महाराष्ट्रातून केवळ स्व.प्रमोद महाजन व नितीन गडकरी यांनाच केंद्रांमध्ये पक्षीय मोठी जबाबदारी मिळाली होती या दोघानंतर ही जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मंत्री विनोद तावडे यांना मिळाली आहे. यापुर्वी त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपला राजकीय प्रवास सुरु केला होता ते संघ परिवार आणि भाजपच्या मुशीत वाढले त्यामुळे त्यांना मोठी संधी मिळत गेली. यापूर्वी ते मुंबई भाजपाचे अध्यक्ष असताना मुंबई महापालिकेत भाजपाला घवघवीत यश मिळाले होते तसेच २०१४ साली मुंबईच्या बोरिवली मधून ते विधानसभेवर देखील निवडून आले होते.त्यानंतर ते फडणवीस सरकारच्या काळात शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते.

२०१९ मध्ये मात्र त्यांना विधानसभेला तिकीट नाकारले होते. तरीदेखील त्यांनी पक्षावर नाराजी न दाखवता सतत पक्षकार्यात यात गुंतून राहिले. पक्षश्रेष्ठींनी दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. तसेच महाराष्ट्राच्या विधान परिषदेत देखील त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काही काळ काम पाहिले आहे. एकेकाळी महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं मात्र फडणवीस यांच्या काळात त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न झाले अशीही चर्चा आहे.
भाजपा कार्यकारणी मध्ये सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली होती तसेच हरियाणाच्या प्रभारी पदी देखील ते होते. तीन वर्षात पीएमपीओच्या प्रत्येक अभियानाच्या नियोजनाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. या सर्व गोष्टींचे फळ म्हणून त्यांना भाजपाच्या सरचिटणीस या महत्त्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.