कळंब(राजकीय कट्टा वाढदिवस विशेष) पत्रकार म्हटलं की समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा आदर्शवत असतो. मात्र अनेक पत्रकार हे आयुष्य गेलं तरी देखील आपल्या आयुष्यात व्यक्तिगत जीवनात काही बदल घडवून आणू शकत नाहीत. मात्र दिलीपराव गंभीरे यांनी पत्रकारितेला उद्योगाची जोड देत स्वतःच्या जीवनात चांगली सकाळ निर्माण केली. त्यांनी पत्रकारितेमध्ये डॅशिंग म्हणजे सिंघम पत्रकारिता करत कळंब तालुक्यातील अनेक विषय मार्गी लावले.

पंढरपूर-खामगाव या रस्त्यावर अनेक नागरिकांची परेशानी होत होती दूर करण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सातत्याने त्यांनी आवाज उठवत हा रस्ता लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न केले तर कळंब शहरातील 101 या गट नंबर मधील प्लॉट धारकांनी एकेकाळी आपला जीव भांड्यात ठेवला होता मात्र त्याठिकाणी देखील आपल्या सिंघम पत्रकारितेच्या माध्यमातून दिलीपराव गंभीर यांनी 101 नगर मधील लोकांना आपल्या हक्काचे प्लॉट पुनश्च एकदा मिळवून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम तर केलेच मात्र त्या भागात मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून देखील ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या अनेक वर्षापासून ते सकाळ या वृत्तपत्रात पत्रकारिता करत आहेत. त्यांनी कळंब तालुक्यातील अनेक विषय मार्गी लावले आहेत मात्र पत्रकारिता केवळ उपजीविकेचे साधन नाही हे ओळखून त्यांनी पत्रकारितेला उद्योगाची जोड देत त्यांचे सर्व बंधू व सहकारी मित्र यांच्या सहाय्याने अनेक छोटे-मोठे उद्योग करत स्वतःची व आपल्या परिवाराची आर्थिक उंची वाढावी यासाठी प्रयत्न केले. पत्रकारिता करत असताना जर आपण स्वतः सक्षम असू तरच खऱ्या अर्थाने कोणाचीही भीडभाड न ठेवता पत्रकारिता करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. आणि म्हणूनच आज दिलीपराव गंभीरे यांच्याबद्दल कळंब तालुक्यातील राजकारणी सामाजिक कार्यकर्ते व इतर लोकात एक आदराची भावना आहे.

अशा या सिंघम पत्रकाराचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय कट्टाच्या वतीने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.