उस्मानाबाद राजकीय कट्टा प्रतिनिधी -भूम तालुक्यातील अंतरगाव येथील मा. विद्यालयाचे हिंदी विषय शिक्षक सचिन पाटील यांना ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळी भान (ता. श्रीरामपूर) यांच्या वतीने राष्ट्रीय उत्कृष्ट हिंदी अध्यापन सेवाकार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. टाकळी भान येथे राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलनात विश्व हिंदी साहित्य
(प्रयागराज) अध्यक्ष प्राध्यापक डॉ.शहाबुदीन शेख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रा. डॉ.
सदानंद भोसले यांच्या हस्ते सचिन पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशाबदल संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब गोरे, शाळेचे मुख्याध्यापक भानुदास खोगरे आदींनी सचिन पाटील यांचे अभिनंदन केले.
आ.ज्ञानराज चौगुलेंच्या निषेधार्थ उमरग्यात संतप्त शिवसैनिकांनी काढली रॅली
उमरगा-उमरगा तालुक्यातील संतप्त शिवसैनिकांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या निषेधार्थ मंगळवारी शहरातून रॅली काढली. या रॅलीचे नेतृत्व माजी तालुका प्रमुख सुरेश...