भूम (राजकीय कट्टा प्रतिनिधी) भूम तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेश शेंडगे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. अत्यंत कमी वयात गणेश शेंडगे यांनी राजकारणामध्ये आपले स्थान भूम शहरामध्ये व तालुक्यांमध्ये बनवले होते.
मराठवाड्यातील पहिले मनसेचे नगरसेवक म्हणून देखील त्यांची ओळख मराठवाड्याला 2016 साली झाली होती. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी आमदार प्रा तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला होता व त्यांना 2019 विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर भूमचे शिवसेना तालुकाप्रमुख पद देण्यात आले होते.
गेल्या दोन महिन्यापासून ते औरंगाबाद येथे उपचार घेत होते मात्र आज त्यांची प्राणज्योत उपचार घेत असताना मालवली. त्यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवर नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी-मुले असा परिवार आहे.