
कळंब (राजकीय कट्टा प्रतिनिधी) -कळंब तालुक्यातील वाकडी (के. ) येथे शिवजन्मोत्सवानिमित्त शिवक्रांती विचार मंचाच्या वतीने विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या गावकऱ्यांना विविध पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागनाथ जाधव हे होते. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे जलमंदिर प्रतिष्ठान चे अजित भैया काळे संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड पंचायत समिती उपसभापती गुणवंत पवार, प्रा जगदीश गवळी, तुषार वाघमारे सागर बाराते , श्रुती जाधव पत्रकार ज्ञानेश्वर पतंगे, अशोक शिंदे, गावचे सरपंच परीमळा कोल्हे उपसरपंच तुकाराम कुरूंद बालाजी कोल्हे, आश्रुबा कोठावळे, बालाजी फाटे, पाटील आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कर्तृत्व सिध्द करणाऱ्या सुपुत्रांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यात दत्तात्रेय जंगल कोल्हे, तुकाराम कोल्हे, संदीप वाघमारे (यशस्वी उद्योजक ) ,मनिषा लक्ष्मण कांबळे (हिरकणी पुरस्कार ) , सोनिया कुरूंद ,संगीता कुरूंद, ज्योती शिंदे, ज्योती रणदिवे (राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती रमाई पुरस्कार )शारदा भागवत घोळवे (उत्कृष्ट मुख्याध्यापिका), अतुल कोल्हे ( शिवकार्य पुरस्कार), बाबासाहेब रणदिवे (उत्कृष्ट सेवा पुरस्कार ) यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना शरद गोरे म्हणाले की, शिवरायांचा खरा विचार म्हणजे पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करून ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी वंचित आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे होय . छत्रपती शिवाजी महाराजांनी पाणी व वृक्ष संवर्धनाकडे विशेष लक्ष दिले . शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आपल्या सैनिकांनी शेतकऱ्यांची लूटमार करू नये यासाठी आज्ञापत्र काढली आजच्या सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत यासाठी कायम स्वरूपी योजना राबविणे अत्यावश्यक आहे असे मत व्यक्त केले. यावेळी प्रा जगदीश गवळी यांनी शिवरायांचा ढाल तलवारी, जातीपातीच्या पलीकडचा, सामाजिक परिवर्तनाचा लढा समजून घेणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी प्रा तुषार वाघमारे ,श्रुती जाधव यांची भाषणे झाली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिव क्रांती विचार मंचाचे अशोक कुरुंद यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गणेश रसाळ, निखील कुरुंद विशाल कोल्हे, हनुमंत गोरे, सचिन वाघमारे, अनिकेत कोळी, उमेश कुरुंद ,आनंद रणदिवे नितीन रणदिवे , विकी रणदिवे, तानाजी कुरुंद ,गणेश कोल्हे आदींनी हेपरिश्रम घेतले. या कार्यक्रमास गावातील महिला, पुरुष व युवक यांची उपस्थिती लक्षणीय होती.