मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) राज्यात नुकत्याच झालेल्या सहा विधान परिषदेच्या जागेपैकी 4 जागा जिंकत भाजपाने या निवडणुकीत बाजी मारली आहे. सहापैकी यापूर्वीच चार जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यामध्ये कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून गृहराज्यमंत्री काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील,धुळे- नंदुरबार मधून अमरीश पटेल तर मुंबई मधून शिवसेनेचे सुनील शिंदे व भाजपाचे राजहंस सिंह हे बिनविरोध निवडून आले होते.बिनविरोध निवडीमध्ये भाजपा दोन काँग्रेस व शिवसेना प्रत्येकी एका जागेवर ती विजय झाली होती.
त्यानंतर राज्यात नागपूर व अकोला-बुलढाणा-वाशीम या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून प्रत्यक्ष विधान परिषदेची निवडणूक झाली. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपाचे सरचिटणीस तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपकडून उमेदवारी दिली होती तर काँग्रेसकडून सुरुवातीला रवींद्र भोयर यांना उमेदवारी जाहीर केली होती मात्र शेवटच्या एक दिवस अगोदर मंगेश देसाई यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 तर काँग्रेस पुरस्कृत मंगेश देसाई यांना 186 मतं मिळाली तर रवींद्र भोयर यांना-1 व अवैध मतांची संख्या ही 5 होती.
अकोला-वाशीम-बुलढाणा मतदार संघातून गेल्या चार टर्म आमदार असणारे गोपीकिशन बजोरिया यांना धक्कादायक अशा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या मतदारसंघातून भाजपाकडून वसंत खंडेलवाल यांनी 443 मते घेत गोपीकिशन बाजोरिया(334) यांचा 91 मतांनी पराभव केला या मतदार संघात देखील अवैध मते ही 31 होती.