मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) महाराष्ट्रात जाहीर झालेल्या पाच विधानपरिषदेच्या जागांसाठी भाजपाच्या उमेदवारांची घोषणा रात्री उशिरा झाली. यामध्ये कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अमल महाडिक,धुळे-नंदुरबार मधून अमरिश पटेल, नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे,अकोला-बुलढाणा-वाशीम मधून वसंत खंडेलवाल तर मुंबई मधून राजहंस सिंह यांच्या नावाची घोषणा झाली आहे.

यामध्ये अमरिश पटेल हे विद्यमान विधान परिषद सदस्य आहेत तर उर्वरित चार ही जण विधान परिषदेच्या दृष्टीने नवखे चेहरे आहेत. अमोल महाडिक व चंद्रमा जी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे यापूर्वी विधानसभा सदस्य होते मात्र अमल महाडिक यांचा कोल्हापूर मधून ऋतुराज पाटील यांनी पराभव केला होता तर चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपामधून त्यावेळी उमेदवारी नाकारण्यात आली होती.
कोल्हापूर व नागपूर धुळे नंदुरबार मध्ये भाजपाची लढत काँग्रेसच्या उमेदवारांची होईल तर अकोला-बुलढाणा-वाशीम मुंबई येथे भाजपच्या उमेदवारांची लढत ही शिवसेनेच्या उमेदवाराची असणार आहे.
विशेष म्हणजे ही निवडणूक म्हणजे ‘जिस का दाम उसका काम’ अशी म्हटले जाते.त्यामुळे यामध्ये कोण बाजी मारणार हे येणाऱ्या काही दिवसातच समजणार आहे.