उस्मानाबाद(प्रतिनिधी) प्रात्यक्षिक ज्ञानाने विद्यार्थ्यांचा विकास होतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक कार्य मन लावून केले पाहिजे आळंबी उत्पादन तंत्रज्ञान हे कार्य आपण प्रात्यक्षिक म्हणून न करता ते आवडीने करावे असे प्रतिपादन डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी केले.ते उस्मानाबाद येथील डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या आळंबी प्रात्यक्षिक कार्याच्या शुभारंभ प्रसंगी डॉ. प्रतापसिंह पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रा.पी.के.गुरव,श्रीमती प्रा.पाटील एस.एन.,प्रा देवानंद शेटे, प्रा.सचिन खताळ,प्रा. सतिश दळवे, प्रा.विजय नागरगोजे हे उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की, मशरूम हे स्वादिष्ट व पचणास हलके असते त्यामध्ये पिष्टमय पदार्थ साखर कमी खूप कमी असल्याने मधुमेह उच्च रक्तदाब असणाऱ्यांना मशरूम खाणे हे गुणकारी आरोग्यवर्धक आहे. तसेच मशरूम मध्ये प्रथिनांचे प्रमाण 2.7 ते 3.9 टक्के असते हे प्रमाण फळे भाजीपाल्यांच्या तुलनेमध्ये दुप्पट आहे.तसेच हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी त्वचारोग वजन कमी करण्यासाठी व आम्लपित्तावर मशरूम उपयुक्त ठरते म्हणून विद्यार्थ्यांनी या प्रात्यक्षिक कार्यामध्ये ही कला चांगल्या पद्धतीने समजून घेणे गरजेचे आहे. प्रात्यक्षिक कार्य हे तुम्हाला पुढील फक्त सहा महिने पुरते असले तरी देखील याचा उपयोग मात्र आयुष्यभर होणार आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे प्रात्यक्षिक अभ्यासक्रमात आहे म्हणून नव्हे तर आवड म्हणून करणे गरजेचे आहे. असे केले तर आपणास नोकरीपेक्षा आपला व्यवसाय देखील पुढे नेता येऊ शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थ्यांमधून एम.सिंधूप्रिया,के.श्रुती, सुमित गंगाथाडे व निलकिरण यांनी मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचालन अपेक्षा चोबे व आकांक्षा मते यांनी केले तर प्रास्ताविक व वनस्पती रोगशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख कानिफनाथ प्रा.कानिफनाथ बुरगुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.कालिदास बंडे यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे व्यवस्थापक हरी घाडगे,गणेश पांडव, पद्मजा कोळी,प्राजक्ता माने,सुमित शिरसाट,सुमित पाटील यांनी परिश्रम घेतले.