राष्ट्रवादी ची वाशी नगरपंचायत निवडणुक पूर्व आढावा बैठक संपन्न
वाशी (राहुल शेळके राजकीय कट्टा प्रतिनिधी )पुढील काळात होणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी नगर पंचायत निवडणुक स्वबळावर लढण्यासाठी भूम-परंडा-वाशी चे माजी आमदार राहुल मोटे यांनी रविवारी दुपारी निवडणुक पूर्व आढावा बैठक, मार्गदर्शन व निवडी कार्यक्रम वाशी येथे पार पडला.
भूम-परंडा-वाशी चे माजी आमदार राहुल मोटे यांनी वाशी नगरपंचायत निवडणूक पूर्व आढावा बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षनिरीक्षक रमेश बारस्कर यांच्या उपस्थितीमध्ये रा. कॉ. पार्टीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

तसेच पारा जि. प. गटातील जिल्हा कार्याध्यक्ष नितीन बिक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली पारा येथील दिलीप भराटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष, बाळासाहेब भराटे यांची सहकार सेल तालुका कार्याध्यक्ष, दत्तात्रय भराटे यांची राष्ट्रवादी किसान तालुका कार्याध्यक्ष, ज्ञानेश्वर तांबडे यांची ओबीसी सेल तालुका कार्याध्यक्ष, अमोल घोळवे यांची रा. कॉ. तालुका सरचिटणीस,आदेश कुरुंद यांची युवक तालुका सरचिटणीसपदी निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, पार्टीचे निरीक्षक रमेश बारस्कर, ज्येष्ठ नेते अरुणोजीराव दादा देशमुख ,भूम-परंडा-वाशीचे माजी आमदार राहुल मोटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन तथा पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील,प्रदेश चिटणीस सुरेश पाटील,कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर,युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, सरचिटणीस नितीन बागल, जिल्हा कार्याध्यक्ष नितीन बिक्कड,महाराष्ट्र प्रदेश रा. कॉ. सरचिटणीस प्रशांत कवडे,वाशी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप घोलप , युवक तालुकाध्यक्ष संतोष पवार, मछिंद्र कवडे, एडवोकेट सूर्यकांत सांडसें, बालाजी मोटे,आदेश कुरूंद, अभिजित जगताप, संतोष कवडे, यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.