कळंब,ता.२१ (राजकीय कट्टा प्रतिनिधी) ; सुपारी फुटली,लग्नाची तारीख ठरली आणि अवघ्या एक महिन्यातच लग्न मोडलं हा अजब प्रकार कळंब तालुक्यात घडला आहे.लग्न होण्याच्या आधी मुलाने होणाऱ्या भावी पत्नीला तुझ्या वडिलांना पाच तोळ्याचे कंगण करायचं सांग म्हणून फोनवरून अश्लील बोलण्याचा सपाटा सुरू ठेवला.नवरीमुलीने धाडस दाखवत सोन्याचं कंगण मागणाऱ्या भावी नवऱ्या सोबत लग्न न करण्याचा निर्णय घेऊन चांगलाच धडा शिकविला.
कळंब तालुक्यातील गावातील एका जमीनदारांच्या मुलाशी धारूर तालुक्यातील मुलीशी विवाह ठरला होता.मुला-मुलीच्या नातेवाईकांत गुपचूप हुंड्या संदर्भात देवाण घेवाण ठरले.ठरल्याप्रमाणे अडीच लाख रुपयांपर्यंत मुलीच्या मंडळींकडून साखरपुढा ते लग्नाची तारीख काढण्यापर्यत खर्च करण्यात आला.
१० आक्टोंबर रोजी मोठ्या थाटात सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला.२९ नोव्हेंबर म्हणजे आजपासून सात दिवसांनी विवाह होणार होता.यासाठी मुलाच्या मंडळींना मुलीच्या मंडळींकडून मोठा मानपान देण्यात आला.म्हणतात ना लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात.अशी आपल्याकडे म्हण आहे.लग्न म्हणजे दोन व्यक्तीच एकत्र येणं नव्हे तर दोन कुटूंब या नात्याने जोडली जातात.हुंडा देण्याघेण्याच्या प्रथेवरून विवाह मोडल्याचे अनेक प्रकार आजवर महाराष्ट्राने पाहिले आहेत.
ताजे उदाहरण म्हणजे कळंब तालुक्यातील एका गावातील मुलगा राम (नाव काल्पनिक आहे मात्र बातमी खरी आहे) व धारूर तालुक्यातील एक मुलगी अनुसया(नाव काल्पनिक आहे मात्र बातमी खरी आहे)या दोघांच्या लग्नाची सुपारी फुटली तारीख ठरली.मुलगा रोजच नशेत तर्राट होऊन मुलीला फोन करायचा.गुरुवार (ता.१८) रोजी असाच मुलाने तुझ्या वडिलांना सांग पाच तोळ्याचे कंगण घाल म्हणून मुलीला फोन केला.चिडलेल्या मुलीने सर्व हकीगत आपल्या वडिलांना सांगून नशेत तराट असलेल्या या बिनडोक्यासोबत मोठं धाडस करत विवाह न करण्याचा निर्णय घेतला.लग्न मोडल्याचा राग मनात धरून शुक्रवार (ता.१९) भावी नवरदेव व त्याचे मित्र यांनी मुलीच्या गावी जाऊन मुलीच्या भाऊ व वडिलांसोबत भांडणे केली.
याप्रकरणी युसुफवडगाव ता. केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.