
उस्मानाबाद (राजकीय कट्टा प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांचा दोन दिवसीय उस्मानाबाद दौरा होता.यामध्ये त्यांनी तुळजापूर,उस्मानाबाद,वाशी या ठिकाणी राष्ट्रवादी परिवार संवाद हा कार्यक्रम घेतला.तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मधील महत्त्वाच्या नेत्यांच्या घरी देखील भेटी दिल्या.त्याचाच एक भाग म्हणून उस्मानाबादचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली असता त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राज्यमंत्री ना.संजय बनसोडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा निरीक्षक जयसिंगराव गायकवाड राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा ताई सलगर,आमदार विक्रम काळे, भूम-परंडा-वाशीचे माजी आमदार राहुल मोटे,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार,नगरसेवक मसुदभाई शेख,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मा.नगरसेवक कळंब तारेख मिर्झा,गटनेते नगर पालिका गणेश खोचरे,शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे,नगरसेवक प्रदीप घोणे,विवेक घोगरे,नगरसेवक सनी पवार,नगरसेवक मृत्यूंजय बनसोडे, आळणीचे सरपंच बिटु वीर,वक्ता प्रशिक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुशील शेळके,नंदकुमार गवारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंतनू खंदारे,शहर उपाध्यक्ष मनोज मुदगल,शहर विद्यार्थी अध्यक्ष सौरभ देशमुख,प्रवीण तांबे,अमोल सुरवसे,विकी चव्हाण, योगेश सोन्ने-पाटील,रामेश्वर पवार,सुहास मेटे,बिजु मातने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

डॉ.प्रतापसिंह पाटील लिखित ‘भारत आज आणि औद्योगिक क्रांती पूर्वी’
या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या पुस्तकाचे लेखन कोरोना काळात धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी केले आहे.या पुस्तकात भारताची आजची परिस्थिती आणि औद्योगिक क्रांती पूर्वी भारत कसा होता याचं वर्णन केलेले आहे.