
मनिषाने निर्माण केली गरजवंत महिलांच्या जगण्याची आशा
कळंब राजकीय कट्टा – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सगळीकडे हाहाकार उडाला होता ग्रामीण भागासह शहरातील ही हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्यांना दोन वेळचे जगणे मुश्किल झाले होते. अशा परिस्थितीत ज्याच्याकडे देण्यासारखे आहे आणि ज्याच्यामधये देण्याची वृत्ती आहे अशांनी भरभरून दिले अशा पैकीच कळंब शहरातील स्वामिनी ब्युटी पार्लर चालविणाऱ्या मनिषा कळंबे (शिंदे) यांनी पहील्या लॉकडाऊन मध्ये नाममात्र दरात ग्रामीण व शहरी भागातील 50 महीलांना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण दिले.

हे प्रशिक्षण देत असताना त्यांच्या लक्षात आले की अनेक महीला नाममात्र फिस सुध्दा देऊ शकत नाहीत परंतु त्यांना जीवनात काहीतरी करण्याची इच्छा आहे. ही गरज लक्षात घेऊन त्यांनी दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये गरजवंत ग्रामीण भागातील 20 महीला व मुलींना ब्युटी पार्लरचा बेसिक आणि अॅडव्हान्स कोर्सचे दिड महीन्याचे मोफत प्रशिक्षण दिले सोबतच या प्रशिक्षणार्थ्यांना त्यांनी ब्युटी पार्लरचा व्यवसाय उभा करण्यासाठी आवश्यक असलेले एक लाख रुपयांचे साहित्याचे मोफत वाटप केले.

सध्या या सर्व प्रशिक्षणार्थीनी स्वतच्या गावातच त्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे या महीला आज त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लावत आहेत. एकंदरीतच सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ यांना अभिप्रेत असणारा महीला वर्ग आज तयार होत आहे.असाच वसा विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या महिलांनी घेतला तर राजमाता जिजाऊ यांना अभिप्रेत असलेले कार्य पुर्ण होऊ शकते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही एक अशा महिलेच्या कार्यावर प्रकाश टाकला ज्यांनी आपल्याकडे फारसे देण्यासारखे नसतानाही आपल्याकडे जे आहे. त्या कलेच्या माध्यमातून महिलांसाठी प्रत्येक गावोगाव रोजगार निर्मितीचे कार्य केलं त्या महिलेच्या कार्याचा आढावा आजच्या या राजकीय कट्टा महिला विशेष यामध्ये घेतला आहे.

आपल्याला हा लेख आवडल्यास इतर ग्रुप वर देखील शेअर करायला विसरू नका
मी सर्व सामान्य कुटुंबातील असल्याने मला गरीबीची व सर्वसामान्य गरजांची जाणीव आहे मी पहिल्या लॉकडाऊन वेळी नाममात्र दरात प्रशिक्षण दिले त्यावेळी मला अनेक महीलांना या क्षेत्रात पुढे यायचे आहे हे दिसून आले म्हणून मी हा उपक्रम घेतला आज या महिला स्वत:च्या पायावर उभा आहेत म्हणून मी समाधानी आहे. भविष्यातही मी माझ्या व्यवसायातून दैनंदिन बचत करून महिलांचे सक्षमीकरण करणार आहे. ज्या मुलींना इतर क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी देखील मार्गदर्शन व सल्ला मी व माझ्या ब्युटी पार्लरच्या माध्यमातून देणार आहे.
-मनीषा कळंबे(शिंदे).
स्वामिनी पार्लर अँड ट्रेनिंग सेंटर,कळंब