कळंब:- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय शाळा वतीने प्रतिवर्षीप्रमाणे रासेयो शिबिराचे
आयोजन दिनांक १५ ते २१ मार्च २०२२ या कालावधीत करंजकल्ला ता कळंब येथे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीमध्ये सरपंच श्री विशाल पवार, डॉ. रामकृष्ण लोंढे , (मा. अध्यक्ष आयएमए ), उद्घाटक ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर तर अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. सुनिल पवार, यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा व पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
यावेळी उद्घाटक डॉ. मोहेकर म्हणाले,” महाविद्यालयीन तरुणांनी समाजात विधायक कार्य करण्याची गरज आहे. या कोरोना काळात आरोग्य विषयक जनजागृती करणे, हे अत्यंत आवश्यक बाब आहे. ग्रामीण भागातील लोकांना या शिबिराच्या माध्यमातून सहकार्य करणे गरजेचे आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. रामकृष्ण लोंढे म्हणाले , “आपल्या तरुणांनी शिक्षणाच्या माध्यमातून विविध पदावर कार्य करताना आई-वडिलांची सेवा करावी, समाजातील लोकांना वेळोवेळी मदत करावी, कारण आपण एक याचं समाजाचा घटक आहोत. महाविद्यालयाच्या वतीने विविध प्रकारचे आरोग्य विषयक उपक्रम राबविताना आम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून सतत मदत करु असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल पवार म्हणाले,”रासेयो सारख्या शिबिराच्या माध्यमातून गावातील असलेली समस्या दूर करण्याची आणि त्यातून समाजसेवा करण्याची संधी मिळते. प्रत्यक्ष लोकांच्या अडीअडचणी समजून घेता येतात आणि प्रतिकूल परिस्थितीमधून आपल्याला संघर्ष करून पुढे जाण्यासाठीचे धडे सुद्धा यातून मिळतात. या प्रसंगी गावचे सरपंच श्री विशाल पवार म्हणाले,” मोहेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. सामाजिक उपक्रमातून गावासाठी कार्य केले जाते. वृक्षारोपण, जलसंवर्धन आरोग्यविषयक शिबिर, महिला मेळावा, सुशिक्षित बेरोजगारांसाठी कार्य, पशुचिकित्सा, दंतचिकित्सा, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामस्वच्छता अभियान आणि मंदिर परिसर स्वच्छता अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो, अशा शब्दांत मतं व्यक्त केले.
सदर रासेयो शिबिराचे हे चौथे वर्ष असून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.केदार काळवणे यांनी तर प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. नामानंद साठे तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी मानले. यावेळी लेफ्टनंट प्रा.डॉ. के. डब्ल्यू पावडे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. संदीप महाजन, प्रा डॉ. विश्वजीत मस्के, प्रा डॉ. श्रीकांत भोसले , प्रा. राम दळवी, प्रा. सुशील जमाले, प्रा. डॉ.हेमंत चांदोरे,प्रा डॉ. रुपेश मानेकर, श्री अरविंद शिंदे, श्री संदीप सूर्यवंशी तसेच प्रशालेतील शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.