मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही वेळापूर्वीच शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्वर ओकला भेट घेतली. या भेटी मागचे कारण एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकर मिटवा आणि कामगारांच्या वेतन विषयक मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघावा यासाठी ही भेट असल्याचे भेटीनंतर सांगण्यात आले. सुमारे तासभर झालेल्या चर्चेत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण आणि सातवे वेतन आयोगाची अंमलबजावणी हे प्रमुख मुद्दे असल्याचे देखील बैठकीनंतर सांगण्यात आले.
मात्र या भेटीची चर्चा सोशल मीडियात वेगळ्या पद्धतीने रंगवण्यात आली आहे. महाराष्ट्रात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप आहे आणि सामान्य माणूस मेटाकुटीला आलेला आहे यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मध्यस्थाची भूमिका बजावत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत त्यांनी या संदर्भात मध्यस्थी करून तोडगा काढावा अशी ही विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याचे समजते.