मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) राज्यातील दुकानाच्या पाट्या मराठीतच असाव्यात हा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्याची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या ऐतिहासिक वारशाचे जतन व्हावे आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने मंत्र्यांच्या बंगल्यांना आता किल्ल्याची नावे देण्याचा निर्णय झाला आहे.
यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याला ‘शिवगड’ नाव असणार आहे दादा भुसे यांचा बंगला ‘राजगड’ म्हणून ओळखला जाणार आहे. के.सी.पाडवी यांचा बंगला ‘प्रतापगड’, आदित्य ठाकरे यांचा ‘रायगड’, विजय वडेट्टीवार यांचा ‘सिंहगड’, उदय सामंत यांचा ‘रत्नसिंधू’, अमित देशमुख यांचा ‘जंजिरा’, वर्षा गायकवाड यांचा ‘पावनगड’, हसन मुश्रीफ यांचा ‘विजयदुर्ग’, यशोमती ठाकूर यांचा ‘सिद्धगड’, सुनील केदार यांचा ‘पन्हाळगड’, गुलाबराव पाटील यांचा ‘सुवर्णगड’, संदिपान भुमरे यांचा ‘ब्रह्मगिरी’,अनिल परब यांचा ‘अजिंक्यतारा’, तर ‘प्रचितगड’ हा बंगला बाळासाहेब पाटील यांचा असणार आहे.
महाराष्ट्रातील हा निर्णय चांगला जरी असला तरी मंत्र्यांचा कारभार देखील बंगल्याच्या नावाला साजेल असा असावा अशी मात्र सर्वसामान्य माणसाची अपेक्षा आहे