उस्मानाबाद(राजकीय कट्टा व्यक्तिविशेष)एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काय संघर्ष असू शकतो मात्र इच्छाशक्ती असल्यानंतर त्यावर तो कशी मात करू शकतो याची उदाहरणे आपण अनेक पाहिले आहे. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील शेलगाव या गावचे मूळ रहिवासी असणारे व सध्या येरमाळा येथे शैक्षणिक क्षेत्रात पाऊल ठेवत आपल्या नावाचा व आपल्या शाळेचा ठसा सबंध जिल्ह्यात उमटवणारे सचिन पाटील सर यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय कट्टाच्या वतीने त्यांच्या जीवनावर टाकलेला हा प्रकाश.

सचिन पाटील सर यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील शेतकरी तर आई अंगणवाडी सेविका आहेत. सुरुवातीच्या काळात दहावी झाल्यानंतर आपण काय करावे म्हणून त्यांनी छोट्याशा मंडप व्यवसायात सुरुवात केली. त्याकाळी मंगल कार्यालय ही सिस्टीम फारशी अस्तित्वात नव्हती अशावेळी ग्रामीण भागांमध्ये मोठमोठे मंडप टाकण्याची स्पर्धा त्या काळात लागायची आणि यासाठी खूप मोठं भांडवलही लागत होतं मग सचिन पाटील सर यांनी हळूहळू आपल्या या मंडप व्यवसायात जम बसवला आणि जवळपास पाच ते सहा वर्ष हा व्यवसाय अत्यंत चिकाटीने चांगल्या पद्धतीने करत आपला नावलौकिक कळंब तालुक्यांमध्ये पसरवला. मात्र एका लग्नामध्ये त्यांनी मंडप टाकला आणि तो मंडप वाऱ्याने उडून गेला आणि सचिन पाटील सर यांना धक्का बसला विशेष म्हणजे त्या काळात त्या मंडपात काही लोक अडकून किरकोळ जखमी देखील झाले होते. हीच गोष्ट मनात ठेवून आपल्याला हा उद्योग आता यानंतर करायचा नाही असं त्यांनी ठामपणे ठरवलं व आपण काहीतरी नवीन करूया म्हणुन उस्मानाबादला आले. त्यांना कोणीतरी सांगितले की इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करा यासाठी काय करावे लागते तर संस्था रजिस्टर्ड असावी लागते कळल्यानंतर त्यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालय गाठले आणि कोण कोणती कागदपत्रे लागतात हे विचारून घेतले त्याचवेळी घरी गेल्यानंतर जुनी एक पेटी पाहत असताना त्यामध्ये एक संस्था रजिस्टर्ड असलेली कागदपत्रे त्याना त्यामध्ये सापडली. त्यांनी आई-वडिलांना विचारल्यानंतर आपण एक संस्था रजिस्टर्ड केली होती असं सांगितलं आणि त्यांचा आनंद गगनात त्यावेळी मावत नव्हता.

त्यानंतर त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केला आणि येरमाळा येथे सुरुवातीला शाळा सुरू केली तीही भाड्याच्या खोल्यांमध्ये त्यानंतर हळूहळू त्यांनी विद्यार्थ्यांवर परिश्रम घ्यायला सुरु केले. विद्यार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये पूर्वी सोयी सवलती मिळत नव्हत्या त्या त्यांनी हळूहळू जसे जमतील तशा द्यायला सुरुवात केली विद्यार्थ्यांना स्कूल बस व्यवस्था असेल किंवा सुसज्ज इमारत असेल या गोष्टी चांगल्याच द्यायचा असं मनाशी त्यांनी ठाम ठरवलं होतं मात्र भांडवलाअभावी ते लगेच शक्य नव्हतं म्हणून प्रत्येक गोष्ट त्यांनी हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने करत करत आज त्यांच्याकडे जवळपास 10 ते 12 स्वतःच्या स्कूल बस व शाळेची सुसज्ज अशी इमारत देखील आहे. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या देखील दिल्या आहेत आज आपण अनेक तरुण नोकऱ्या नाही असं म्हणून बसलेले पाहिले आहेत मात्र सचिन पाटील सर यांच्यासारखे उमेद व उत्साह ठेवून जर एखाद्या मुलांनी प्रयत्न केले तर यश मिळू शकतं हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कळते.

हे सर्व करत असताना आपणही शिकले पाहिजे म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता त्यांचे शिक्षण सुरू ठेवले व ते आज स्वतः एम.ए.,एम.एड. असे त्यांचे शिक्षण झालेले आहे. ज्या वेळी ते सुरुवातीला या क्षेत्रात होते त्यावेळी ते केवळ दहावी पास होते मात्र इच्छाशक्तीच्या बळावर अध्यापन क्षेत्रातील सर्वोच्च असणारी B.Ed व M.Ed या पदव्या प्राप्त केल्या. शाळेची प्रगती हळूहळू सुरू होती. त्यानंतर त्यांनी २०१६ साली आपल्या शाळेची देवी रोड येरमाळा या ठिकाणी तीन मजली टोलेजंग इमारत विद्यार्थ्यांसाठी खुली केली. २००९-१० साली या शाळेची सुरुवात झाली होती आणि तेव्हापासून ही शाळा कासवगतीने यशाच्या शिखराकडे जात आहे. विद्यानिकेतन शाळेला आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून देखील दर्जा मिळालेला आहे. तर या शाळेचे संस्थापक असणारे सचिन पाटील सर यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागीय मंडळाच्या माध्यमिक व्यवस्थापन समितीवर अशासकीय सदस्यपदी काम करण्याची संधी देखील मिळाली होती. विद्यानिकेतन शाळेचा व संस्थापक सचिन पाटील सर यांचा विविध पुरस्कारांनी सन्मानही करण्यात आलेला आहे त्या पैकीच एक म्हणजे महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते सचिन पाटील सर यांना सन्मानित करण्यात आले होते.

अशा पद्धतीने एका मंडप चालकाचा मंडपवाला ते संस्थापक हा प्रवास खरोखरच आज मला नोकरी नाही माझ्याकडे भांडवल नाही असं म्हणणा-यासाठी आदर्श असे उदाहरण आहे.

अशा या धडपड्या व होतकरू आदर्श संस्था चालकास वाढदिवसाच्या राजकीय कट्टाच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा…