भूम (राजकीय कट्टा प्रतिनिधी) उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम शहर येथे भूम-परंडा-वाशी विधानसभा युवासेनेची आढावा बैठक आज युवासेनेचे विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.
शिवसेनेचे उपनेते,विद्यमान आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत व तसेच जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली,भूम येथील शासकीय विश्रामगृहामध्ये युवासेनेची आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपरिषद निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद वाढविण्यासाठी युवा सैनिकांनी झोकून देऊन काम करावे.तसेच आपल्या ठाकरे सरकारचा योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी युवासेनेने आग्रही राहावे असे मत विभागीय सचिव श्री अक्षय ढोबळे यांनी व्यक्त केले
भूम-परंडा-वाशी या तीनही तालुक्यांमधील युवासेनेची बांधणी चांगली झाली असून त्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकांमध्ये नक्की दिसेल,तसेच युवासेना पदाधिकारी यांनी सुद्धा जनसामान्य नागरिकांच्या कामासाठी झोकून देऊन संघटना वाढीसाठी आणखीन विशेष प्रयत्न करायला हवेत असे मत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे यांनी व्यक्त केले.
सदरील बैठकीमध्ये काही निवडक रिक्त जागेवर नियुक्त्या करून युवा सैनिकांना जबाबदारी दिली.
या बैठकीस विधानसभा युवा अधिकारी विकास जाधवर यांनी प्रास्ताविक केले.
तसेच युवासेना उपतालुका प्रमुख श्री प्रल्हाद आढागळे यांनी सूत्रसंचालन केले.
या बैठकीस,युवा सेनेचे कॉलेज कक्ष प्रमुख अजय धोंगडे,माजी उपसभापती बालाजी गुंजाळ, परंडा युवा सेना तालुका प्रमुख राहुल डोके,युवा सेना तालुका प्रमुख निलेश चव्हाण ग्रामपंचायतचे गटनेते विशाल ढगे युवासेना उपतालुका प्रमुख अशोक पन्हाळे,शहाजी देवकर,विजय भडके,भूम तालुका वैद्यकीय पक्षाचे समन्वयक माऊली दिलीप शालू,युवा सेना कार्याध्यक्ष पांडुरंग जाधवर,उमेश जाधव,भूम शहर प्रमुख प्रभाकर शेंडगे,परंडा शहर प्रमुख वैभव पवार,वाशी शहर प्रमुख लायक तांबोळी,भूम शहर संघटक अविनाश जाधव,वाशी शहर संघटक गणेश हुंबे,विभाग प्रमुख इट मयुर गिरी,भूम तालुका सोशल मीडिया चे संग्राम लोखंडे, उपविभाग प्रमुख पाथरूड भरत तात्यासाहेब कांबळे,ग्रामपंचायत सदस्य राजा भाऊ कोळी,उपविभाग प्रमुख वालवड दत्तात्रय खरात,ओमकार आगळे,शेखर पाटील,महेश कोकणे,युवासेना शाखा प्रमुख लक्ष्मण नागरगोजे,भरत सुरवसे प्रशांत गिरी व तसेच इतर युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.