उस्मानाबाद (राजकीय कट्टा प्रतिनिधी) भूम-परंडा-वाशीचे विधानसभा सदस्य डॉ. तानाजीराव सावंत यांचे महाराष्ट्राचे पर्यावरण तथा पर्यटनमंत्री आदित्य उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त पत्राद्वारे अभिष्टचिंतन केले आहे.
आमदार डॉ.तानाजीराव सावंत हे शिवसेनेचे एक महत्त्वाचे नेते असून ते सध्या उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून देखील काम पाहत आहेत.त्या सोबतच मागील सरकारमध्ये ते जलसंधारण मंत्री देखील होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेना वाढीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. शिवसेनेच्या कोअर कमिटीतील सदस्य म्हणून देखील त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे.

पर्यटनमंत्री ना.आदित्य ठाकरे यांनी पाठवलेल्या शुभेच्छा संदेश पत्रात म्हटले आहे की, जय महाराष्ट्र आणि सस्नेह नमस्कार,सर्व प्रथम आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. विधीमंडळाचे सदस्य म्हणून आपल्या राजकीय प्रवासाचा आलेख चढता राहिला आहे. केवळ राजकीयच नाहीतर जिल्ह्याच्या आर्थिक, शैक्षणिक,सामाजिक अशा सर्वांगीण विकासासाठी आपण महत्त्वपूर्ण कार्य करीत आहात हे अनुकरणीय आहे.

आपणास निरोगी व उदंड आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा अशा मजकुरासह हे पत्र आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांना प्राप्त झाले आहे