गरीबीवर मात करुन कुटूंबाची सामाजिक-आर्थिक घडी बसवणारे-चंद्रकांत तांबे सर
१४ वर्ष खाजगी क्लासेस चालवुन नंतर शासकिय सेवेत.

भूम (राजकीय कट्टा प्रतिनिधी) वाढदिवस विशेष घरची साधारण परिस्थिती वडीलोपार्जित अवघी २ एकर जमिन.यावर आपल भागणार नाही ओळखुन आपण चांगल शिक्षण घेतल पाहिजे अस मनाशी पक्क केल होत मात्र तरीही आईने दिलेले शाब्दिक डोस हे नेहमी मनात राहत होते.आईचे फारस शिक्षण झालेल नसल तरी शिक्षणाबाबत आईचा दृष्टिकोन दुरदृष्टीचा होता.आई नेहमी सांगायची की आपण जर शिक्षण घेऊन नोकरी लागलो तरच आपली हालाखीची परिस्थिती बदलु शकेल म्हणुन तांबे सर यांच्या मनावर ते आईचे शब्द कोरले होते. म्हणून दहावीनंतरच्या शिक्षणासाठी बार्शी गाठली.तेथे राहुन बी.एस्सी.पूर्ण केली नंतर सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयातुन एम.एस्सी.प्रथम वर्ष पूर्ण केले व बार्शी येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयातुन १९९७ ला बी.एड.पूर्ण केल.बी.एड.पूर्ण झाल्यानंतर नोकरीला भरायला पैसे नाहीत म्हणून गुणवत्ता असुन देखील दोन लहान भावाची व कुटूंबाची जबाबदारी आपल्यावर आहे हे ओळखुन त्यांनी १९९७ साली सी.टी.क्लासेसची स्थापना केली.हा क्लास त्यांनी चिंचपूर ढगे या त्यांच्या मुळ गावीच सुरू केल्यामुळे गावातून खुप चांगला प्रतिसाद मिळाला.दहावीच्या पहिल्या बॕचचा निकाल १००% लागला पण ग्रामीण भागात प्रतिसाद चांगला मिळतो पण फीस जमा करताना गावातील संबंध हे अडचणीचे ठरतात म्हणुन त्यांनी भुमला १९९९ ला जवाहिरेज क्लासेसमध्ये सुरुवात केली.बघता बघता क्लासेसचा वटवृक्ष झाला.भुमचा क्लास चालवत आसतानाच बार्शीच्या उबाळे क्लासेसला ही ते रुजु झाले आणि तेथे ही जवळपास ७ वर्ष क्लास घेतले.दरम्यानच्या काळात त्यांचे बंधु डॉ.शशिकांत तांबे या भावाचे शिक्षण पूर्ण झाले व ते सध्या जगदंबा अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम पाहतात तर अॕड श्रीकांत तांबे यांनी देखील पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात काम करुन एक नावलौकिक प्राप्त वकील म्हणून ख्याती मिळवली आहे.

बंधुच्या शिक्षणाच्या काळात जस कमवा आणि शिका असते तसेच त्यांनी क्लास चालवा आणि बंधु शिकवा आस धोरण ठेवुन दोन्ही भावाचे शिक्षण पूर्ण करुन त्यांना नोकरी लागेपर्यंत व एका बंधुला त्याच्या वकीली व्यवसायात स्थिर होई पर्यंत लक्ष देऊन त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे फारस लक्ष दिल नाही मात्र त्यांचे दोन्ही बंधु आपापल्या क्षेत्रात स्थिर स्थावर होईपर्यंत क्लासेस जोमात सुरु ठेवले.मात्र प्रत्येक मराठी माणसाला व्यवसायापेक्षा नोकरी बरी वाटते.तसच चंद्रकांत तांबे सर यांच्या बाबतीत घडले व क्लासेससाठी घेतलेल्या मेहनतीच्या बळावर भूम येथील गुरुदेव हायस्कूल या नामाकिंत शाळेत त्यांना गणित विषयासाठी सहशिक्षक म्हणून जुन २०११ रोजी त्यांना नियुक्ती मिळाली तीही गुणवत्तेच्या बळावर.नोकरीच्या बाबतीतील किस्सा ही रंजक आहे.गुरुदेव हायस्कुलला जागा आहे हे माहित झाल्यावर एका मित्राची शिफारस करण्यासाठी तांबे सर हायस्कुल प्रशासनाकडे गेले होते.तेथील प्रशासनाला तांबे सर यांच्या अध्यापनाची माहिती असल्याने प्रशासनाने तुम्ही लोकाची शिफारस करण्याऐवजी तुम्हीच का नोकरी करत नाहीत अस म्हणाले.आणि हो ना हो करत ते गुरुदेव हायस्कुलला रुजु झाले.खरतर भारतीय संस्कृतीत १४ वर्ष एखाद्या क्षेत्रात काम करुन एखादे नविन क्षेत्र किंवा नोकरी मिळाली तर आपण वनवास संपला असच असच तांबे सर यांनी ही १९९७ ते २०११ हा १४ वर्ष खाजगी क्लास चालवुन नंतर शासकिय सेवेत काम करण्याची संधी मिळाली.

क्लास चालवत असताना कष्टाची लागलेली सवय पुढे ही कायम ठेवत त्यांनी गुरुदेव हायस्कूलचे नाव गणित विषयाच्या बाबतीत पूर्ण महाराष्ट्रभर पोहचवले.प्रयोगशाळा ही संकल्पना आपण विज्ञानाच्या बाबतीत ऐकलेली व पाहलेली पण महाराष्ट्रात प्रथमच गणिताची सुध्दा प्रयोगशाळा होऊ शकते हे चंद्रकांत तांबे सर यांनी दाखवुन दिले.आज त्यांची गुरुदेव हायस्कुल येथील गणित प्रयोगशाळा पाहण्यासाठी उस्मानाबाद जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातुन अनेक गणिताचे शिक्षक येत असुन त्यांना अनेक ठिकाणी गणित विषयाचा तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून बोलवल जात.व तेही विनामानधन घेऊन शक्य तेवढ मार्गदर्शन करतात.

आज शिक्षण घेऊन करायच काय अस समाजातील अनेक लोकांची मानसिकता असताना शिक्षणाच्या बळावर आपण फार काही नाही करु शकलो तरी आपली सामाजिक व आर्थिक परिस्थिती बदलु शकतो हेच चंद्रकांत तांबे सर यांनी दाखवुन दिले आहे.तसेच आज भावा भावाचे फारसे सख्य असत नाही मात्र तांबे सर यांनी आपल्या दोन्ही भावाची जबाबदारी पालक या नात्यांने पार पाडून त्यांना त्यांच्या क्षेत्रात स्थिर होईपर्यंत त्यांनी स्वत व त्यांची पत्नी शासकिय सेवेत असुन देखील त्यांनी सर्व भावांची काळजी एखाद्या पित्यासारखी घेतली.आज अनेक तरुणांनी तांबे सर हे आदर्श मानुन शिक्षण घ्यायला सुरुवात केली तर नक्कीच आपली परिस्थिती कशी ही असु द्या आपण त्यावर मात करु शकतो.इतके आदर्श उदाहरण तांबे सर यांच्या माध्यमातून तयार झाले आहे.भारताचे माजी राष्ट्रपती तथा भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम म्हणायचे की भारताचे भविष्य हे शाळेमध्ये घडत आहे त्यांना अपेक्षित असलेल्या शाळा व शिक्षक हे तांबे सर यांच्या सारखे होते.

या पुरस्काराने झाला सन्मान
चंद्रकांत तांबे सर हे गुरुदेव हायस्कूल,भूम याठिकाणी गणित अध्यापनाचे काम करतात. त्यांनी महाराष्ट्रातील पहिली गणित प्रयोगशाळा विकसीत केली या गणित प्रयोगशाळेत राज्यातील अनेक गणितज्ञांनी भेटी दिल्या आहेत आणि या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
यामध्ये 2019 मध्ये धनेश्वरी शिक्षण समूह, महाराष्ट्र छत्तीसगड यांनी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला आहे. त्यासोबतच 2020 मध्ये राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्कार देखील त्यांना मिळाला आह. त्यासोबतच 2021 मध्ये उस्मानाबाद येथील एकता फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. यासोबतच 2017 मध्ये साने गुरुजी कथामाला यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. या महत्त्वपूर्ण पुरस्कार सोबतच अनेक ठिकाणी त्यांचा गणित तज्ञ म्हणून सन्मान झाला आहे.