
कळंब : महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी शिवसेना युती शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले असून कळंब येथे भाजपा तुळजापूर आमदार राणाजगजितसिंह पाटील, आ. सुजितसिंह ठाकूर व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रयत्नातून 1कोटी 10 लाख 55 हजाराची विकास कामे लवकरच कळंब शहरातील 10 प्रभागात सुरु होणार आहेत.
हा निधी नगर विकास विभागाकडून देण्यात आला आहे. भाजपाचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी हा निधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडुन कळंब शहरासाठी मंजूर करून घेतला. लवकरच या विकास कामाला सुरुवात होणार आहे.यामुळे गावातील विकास कामांना गती मिळणार असून गावाचा चेहरा मोहरा बदलायला सुरुवात होणार आहे. लवकरच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उंची वाढवण्यासाठी आणि सुशोभिकरण करणे आणि इतर कामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे.
कळंब शहराचा आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतला असून यातूनच ही फक्त कळंब शहरातील विकास कामाची सुरुवात आहे. यानंतर कळंब शहर व तालुक्यात लाखो रुपयांचे विकास कामे होणार असल्याचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांनी सांगितले.