मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हालचाली वाढल्या असून ते मोठ्या तयारीने मैदानात उतरणार असल्याचे दिसत आहे.
उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षासोबत युती करणार असून गोव्यामध्ये व मणिपूर मध्ये तृणमूल काँग्रेस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याचे समोर आले आहे.
यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काँग्रेसचे माजी नेते सिराज मेहंदी यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. सिराज मेहंदी यांच्यासोबत अनेक नेते आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील अशी आशा पवार यांनी व्यक्त केली व या पत्रकार परिषदेत भाजपावर पवार यांनी जोरदार टीका देखील केली.
तसेच उत्तर प्रदेशातील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समाजवादी पक्षातील प्रवेशावर बोलताना शरद पवार यांनी भाजपावर भाष्य करत लवकरच 13 आमदार समाजवादी पक्षात प्रवेश करतील असा दावा मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केला आगामी काळात मी स्वतः उत्तर प्रदेशात प्रचारासाठी जाणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.