
बार्शी (राजकीय कट्टा प्रतिनिधी) –
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यात नावलौकिक प्राप्त असून त्याचा आदर्श आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील राज्यकर्त्यांनी देखील घेतला पाहिजे तसेच बार्शीच्या विकासासाठी आमदार राजाभाऊ राऊत व आमचे पक्ष वेगळे असले तरी हातात हात घालून काम करायला तयार आहे असे प्रतिपादन उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी व्यक्त केले ते बाजार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 18 कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व व्यापारी संकुल तसेच सौरउर्जा लोकार्पण सोहळा कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर सोलापूरचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख,आमदार प्रशांत परिचारक, आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, पंचायत समिती सभापती अनिल डिसले, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, शिक्षण संस्थाचालक कपिल कोरके, बार्शी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कथले, चेअरमन रणवीर राऊत, संचालक रावसाहेब मनगिरे आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की उस्मानाबाद जिल्हा जरी असला तरी बार्शी ची बाजारपेठ मोठी आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल बार्शी मध्ये विक्रीला येत असतो येथील व्यापारी बांधवांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्यामुळेच बार्शी बाजार समिती नावारूपास आली आहे आमदार राजेंद्र राऊत व चेअरमन रणवीर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे उत्कृष्ट कामकाज चालू आहे. बार्शी शहराच्या विकास निधीसाठी खासदार म्हणून राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असून निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पंढरपूर येथे पालखी मार्गाचे उद्घाटन झाले याच धर्तीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथील संत गोरोबा काका पालखी मार्गासाठी ही केंद्राकडे पाठपुरावा असून गडकरी यांना निवेदन दिले आहे. राजकीय विरोध न करता विकास कामासाठी एकत्र येऊन विकासाभिमुख कामे व्हावीत हा माझा प्रयत्न राहील. सुरत – चेन्नई सहापदरी मार्ग बार्शीच्या वैराग परिसरातून जाणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच टेंभुर्णी – लातूर हा चार पदरी मार्ग होण्यासाठी व राष्ट्रीय मार्ग होण्यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन दिले असल्याचे त्यांनी सांगितले तसेच बोलताना ते म्हणाले की ते 30 टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला असल्याने नुकसान भरपाई मिळणार आहे.कोरोना काळात बार्शीतील डॉक्टरांनी महत्त्वाची भूमिका पार पाडून उस्मानाबाद जिल्ह्यातील शेकडो रुग्णाचे प्राण वाचवले आहेत त्याबद्दल त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले. व्यापार्याच्या पाठीशी राहण्याची भूमिका राऊत यांची असल्याकारणाने बार्शीत नवीन नवीन उद्योगधंद्यांना चालना मिळाली आहे. बार्शी शहरातील रेल्वे चे सर्व प्रश्न काही दिवसात मार्गी लावणार असून केंद्र सरकारचा मिळणारा खासदार निधी मिळवून देण्यासाठी भाजपातील आमदारांनी पाठपुरावा करावा खासदार निधी मिळाल्यास बार्शी तालुक्याला प्रथम प्राधान्य देणार असून बार्शी बाजार समितीच्या विविध विकास कामासाठी शुभेच्छा देऊन कार्यक्रमासाठी बोलविल्याबद्दल संयोजकाचे आभार मानले.

यावेळी बोलताना माजी मंत्री विजय कुमार देशमुख म्हणाले की आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन रणवीर राऊत यांच्या प्रयत्नातून बाजार समितीचा कायापलट झाला असून विकास कामे जोमाने करून विकासाची घोडदौड चालू ठेवली आहे पालकमंत्री असताना राऊत बार्शी शहरातील विविध विकास कामासाठी माझ्याकडे नेहमी पाठपुरावा करायचे त्यांचा पाठपुरावा बघून मी त्यांना पालकमंत्री असताना विकास कामासाठी भरपूर निधी दिला राऊत आज आमदार झाल्याबद्दल आनंद वाटतो बार्शीतील लिंगायत समाजाचे प्रश्न सोडवावेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना परिचारक म्हणाले की सोलापूर जिल्ह्यात बार्शी बाजार समिती प्रथम क्रमांकावर आहे जसा पंढरपूरला एकादशी चा मान आहे तसाच बार्शीला बारस म्हणून मान असल्याचे सांगितले तसेच पंढरपूर अर्बन बँकेच्या माध्यमातून बार्शी शहरात नवउद्योजकांना आर्थिक मदत केली असून यापुढेही मदत करणार असल्याचे त्यांनी अभिवचन दिले बार्शीतील व्यापाऱ्यांचा बँकेवर दृढ विश्वास असून बार्शी तालुका व परिसरातील मोठ्या प्रमाणावर द्राक्ष पीक असल्याकारणाने बार्शी मध्ये बेदाणा मार्केट होण्यासाठी प्रयत्न करणार असून बेदाण्याचे सौदे मार्केट होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की सत्तांतर झाल्यावर भकास बाजार समितीचा विकास करण्याचा निर्णय घेतला या बाजार समितीमध्ये सफरचंद, जनावरांचा मोठा बाजार आहे.352 ठराव सर्व संचालकाच्या सर्वानुमते झालेले असून सर्वांनी एकदिलाने काम केले आहे. बाजार समिती नवउद्योजकांना सहकार्य करणार असून वैराग येते मनुका सौदे चालू होण्यासाठी पाठपुरावा करणार आहे शेतकऱ्यांच्या कच्च्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून नवीन नवीन प्रकल्प होण्यासाठी मी सर्व प्रकारचे मार्गदर्शन व मदत करणार असून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून राज्य सरकारचे सहकार्य मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असून विरोधकांनी बार्शी तालुक्याच्या हितासाठी राज्यातील सत्तेच्या माध्यमातून बार्शीच्या विकासासाठी निधी आणावा.

प्रास्ताविकात बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत म्हणाले की बाजार समितीची सत्ता ताब्यात आल्यानंतर नियोजनबद्ध कार्यक्रम आखून विकास कामे केली असल्यानेच बाजार समितीचा विकास करु शकलो बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून विविध विकास कामे केली आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती, बार्शीच्या वतीने जवळपास १८ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा #लोकार्पण आणि #भूमिपूजन सोहळा माजी मंत्री आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, माजी नगराध्यक्ष कादरभाई तांबोळी, नगरसेवक विलास आप्पा रेनके, प्रशांत कथले, कौरव आप्पा माने, ॲड.अनिल पाटील, रामेश्वर मांजरे, मदन दराडे, प्रमोद वाघमोडे, नवनाथ चांदणे, झुंबर दादा जाधव, विजय नाना राऊत, यांच्यासह तालुक्यातील आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, ग्रामपंचायतचे सरपंच – उपसरपंच, सदस्य, शेतकरी, व्यापारी बांधव आणि नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश दहीहांडे व आभार प्रदर्शन प्रा.अशोक सावळे यांनी केले

बैलगाडीतून एन्ट्री ची झाली चर्चा
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उद्घाटन व भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर नेत्यांनी बैलगाडी मधून मार्केट कमिटी च्या परिसरात प्रवास केला. याची देखील चर्चा या ठिकाणी रंगली होती तर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत व उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर या दोघांनी एकत्र प्रवास केला व याचे सारथ्य खासदारांनी केले याची चर्चा आज दिवसभर सोशल मीडियात होती..