पुणे(राजकीय कट्टा प्रतिनिधी)महाराष्ट्रात गाजत असलेल्या पुणे मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा.श्री दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांची निवड झाली
आज पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्वसाधारण सभा झाली या सभेमध्ये वरील नियुक्त्या झाल्याचे जाहीर झाले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँके मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते व अध्यक्षपदासाठी प्रा.श्री दिगंबर दुर्गाडे यांच्यासह आमदार अशोक पवार यांचेही नाव प्रामुख्याने चर्चेत होते मात्र उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अजित पवार यांच्या सूचनेनुसार श्री दिगंबर दुर्गाडे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांची नियुक्ती झाली.