
उस्मानाबाद (राजकीय कट्टा प्रतिनिधी) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमांतर्गत दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी पिंपरी(बे) ता.जि.उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्याम घोगरे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी गजानन तालुका नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. प्रदीप देशमुख, तालुकाउपाध्यक्ष जयंत देशमुख, विक्रम पडवळ, पिंपरी(बे) चे सरपंच अजित पाटील, पोलीस पाटील संतोष माळी, मा सरपंच मारुती बिडबाग, मा.सरपंच गौतम गांधले, किरण धाकतोडे, भगवान सपकाळ, सुखदेव बिडबाग, अशोक बिडबाग, मोहन सपकाळ, अभिमान बिडबाग, विक्रम बिडबाग, राजाभाऊ पाटिल,तुकाराम दुरगुळे,अजय देशपांडे, ओंकार सुतार यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…यावेळी सर्व उपस्थितांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री शाम(आण्णा) घोगरे यांनी मार्गदर्शन केले , या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा सरपंच मारुती बिडबाग यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार अशोक बिडबाग यांनी मानले..