
वाशी (राजकीय कट्टा प्रतिनिधी)-महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर व प्राथमिक आरोग्य केंद्र पारगाव येथे रुग्णांना फळे व N 95 मास्क वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे उदघाटक व प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख गौतम लटके शिवसेनेचे वाशी तालुकाप्रमुख सत्यवान गपाट , पंचायत समिती सभापती बाबासाहेब घोलप , वाशी नगराध्यक्ष नागनाथ बापू नाईकवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज , शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदानास सुरुवात केली .

यावेळी उपस्थित, युवासेना प्रमुख बालाजी लाखे माजी उप जिल्हाप्रमुख रवींद्र धर्माधिकारी , विभाग प्रमुख तात्यासाहेब गायकवाड वैद्यकी कक्ष जिल्हा समन्वयक कानिफ कानतोडे, गणप्रमुख प्रदीप कोकणे , शाखा प्रमुख बाबासाहेब हारे , बाबासाहेब गावडे शिवसेना युवा नेते अमोल गायकवाड, उप ता.युवा सेना प्रमुख स्वप्नील कोकाटे , युवासेना शाखा प्रमुख किशोर आखाडे , दशरथ नाळपे , अभय गिराम , विलास खवले , प्रकाश मोटे , अशोक गायकवाड ,बाबू घुले मोहन सुबुगडे, महादेव मोटे , हनुमंत बहिर , गुलशाद पठाण , अभिषेक थोरात , दीपक जाधव , रणजीत भैरट , प्रवीण खवले , कृष्णा खवले , प्रणव बहिर , पंडित चंदनशिव , सलीम शेख , सतीश कोठावळे ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गौतम लटके सर बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या अपेक्षेप्रमाणे सामाजिक कार्यक्रम घेण्यात आला.पारगाव येथील या स्तुत्य उपक्रमाबद्दल शिवसेना, युवा सेना पारगाव मधील सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार व्यक्त केली . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उप तालुका प्रमुख तात्यासाहेब बहिर यांनी केले.

रक्तदान शिबिराचे ही आयोजन
वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरास भरघोस असा प्रतिसाद देत 103 बहाद्दर शिवसैनिकांनी रक्तदान करून खऱ्या अर्थाने आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा केला या कार्यक्रमाचे आयोजन युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस ॲड महेश आखाडे यांनी केले होते.