
भूम-(राजकीय कट्टा प्रतिनिधी)-मल्हार आर्मी सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा जय हनुमान संघटनेचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी आज येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेत कोणत्या पक्षात प्रवेश करावा असं कार्यकर्त्यांना आवाहन करताना कार्यकर्त्यांचा आवाज ऐकत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आपल्याला योग्य असल्याचे मत ऐकून घेत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घोषणा केली.

मल्हार आर्मी व जय हनुमान संघटनेच्या सुरेश कांबळे यांनी भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील २०१९ ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांनी निवडणूक लढवत २५ हजारांपेक्षा जास्त मतदान या मतदारसंघातून घेतले होते. त्यासोबतच मल्हार आर्मी व जय हनुमान संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे त्यांनी गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये विणले आहे याचा देखील फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे. त्यासोबतच भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघ त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. याचा देखील फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होणार आहे.
