उस्मानाबाद राजकीय कट्टा प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी भाजपा प्रणित पॅनेलवर विश्वास दाखवला. भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती आणि कार्यक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून नवनिर्वाचित सदस्य श्री.तात्यासाहेब तांबे, श्री.विष्णू वडणे, श्री.नचिकेत कापसे, श्री.खंडू रोकडे, श्री.शहबाज पटेल, श्री.अण्णासाहेब तांबे यांनी गावातील ५० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांसोबत आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

त्याप्रसंगी तुळजापूरचे नगरसेवक श्री.सचिन पाटील, श्री.राजाभाऊ सोनटक्के, श्री.बाबा श्रीनामे, कुंभारी परिसरातील प्रमुख कार्यकर्ते श्री.पद्मराज गडदे, श्री.बाबा भोगते, श्री.विठ्ठल मोहिते, श्री.उमेश मोरे, श्री.नबीलाल चाचा, श्री.संदीपान मोटे व नागरिकांची यांची उपस्थिती होती.
त्याग, सेवा, समर्पण या पक्षाने दिलेल्या तत्त्वांशी निष्ठा राखत आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण अमुल्य योगदान द्याल जनसेवेसाठी सदैव कटिबद्ध रहाल विश्वास आहे.