कळंब- राजकीय कट्टा प्रतिनिधी शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपप्राचार्य तथा अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. मीनाक्षी प्रल्हादराव शिंदे (भवर) यांना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी पीएचडी प्रदान केली. त्यांनी “मराठवाड्यातील महिला नागरी सहकारी बँका :एक चिकित्सक अभ्यास ” या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांना मार्गदर्शक म्हणून डॉ. टी. एल. बारबोले सेवानिवृत्त प्राध्यापक तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल रण सम्राट क्रीडा मंडळ कळंब या संस्थेच्या अध्यक्षा मनोरमाताई भवर, संस्थेचे सचिव चत्रभुज भवर, उपाध्यक्ष पांडुरंग भवर, कोषाध्यक्ष तथा प्रियदर्शनी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन श्रीधर (बाबा) भवर, प्रा. बाळकृष्ण भवर तसेच सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.
आमदार नितेश राणेची संजय राऊतांवर अश्लिल भाषेत टिप्पणी
मुंबई | पुन्हा एकदा आमदार नितेश राणे यांनी कसदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातलं राजकारण काही दिवसांपासून अधिक...