उस्मानाबाद प्रतिनिधी -डिजिटल मीडिया संपादक पत्रकार-संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष प्रा.सतीश मातने यांनी जाहीर केली. या कार्यकारिणीमध्ये तेरणेचा छावाचे संपादक पांडुरंग मते, राजकीय कट्टाचे परंडा विशेष प्रतिनिधी प्रा.किरण देशमुख,न्यूज सिक्सरचे संपादक सोमनाथ बनसोडे यांची उपजिल्हाध्यक्षपदी तर पत्रकार रमेश अंबिरकर यांची जिल्हा सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे.
या कार्यकारिणी मध्ये सहसचिव म्हणून एम.एच.-25 न्यूजचे संपादक योगराज पांचाळ व कोषाध्यक्षपदी तेरणा एक्सप्रेसचे संपादक नरसिंग खिचडे तर अजित माळी,अकिब पटेल,दीपक जाधव,बालाजी सुरवसे, ओंकार कुलकर्णी यांची जिल्हा कार्यकारिणीत सदस्य म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटना महाराष्ट्र डिजिटल माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांसाठी कार्यरत असून पत्रकारांना मिळणाऱ्या सोयी सुविधा या डिजिटल माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांना देखील मिळाव्यात या हेतूने संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी स्थापन केली आहे. या निवडीबद्दल राज्याध्यक्ष राजा माने, राज्य सचिव नंदकुमार सुतार उपाध्यक्ष तुळशीदास भोईटे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रा.सतिश मातने यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.