
उस्मानाबाद-(राजकीय कट्टा प्रतिनिधी) दि.26
कळंब शहरातील महावीर मंगल कार्यालय येथे बारा बलुतेदार महासंघ व ओ बी सी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ओ बी सी चे नेते पांडुरंग कुंभार होते.तर प्रमुख पाहुणे बारा बलुतेदार संघाचे राज्याचे उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे,लिंगायत संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ मुंडे,तेली समाज संघटनेचे राज्य युवक उपाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,ओ बी सी समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने,बारा बलुतेदाराचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार संतोष हंबीरे,समता परिषदेचे राज्य सरचिटणीस आबासाहेब खोत,कुंभार समाजाचे महाराष्ट्र राज्य चिटणीस कल्याण कुंभार जिल्हाध्यक्ष सतिश कदम यांच्या उपस्थितीत कार्यक्रस्थानी होते.

या कार्यक्रमाची सुरूवात महापुरषांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली.यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी बारा बलुतेदार व ओ बी सी बांधवांनी एकत्रित येण्याची काळाची गरज उपस्थित बांधवासमोर आपल्या भाषणातुन मांडली.धनंजय नाना शिंगाडे यांनी आपल्या भाषणात ओ बी सी समाजाचे महामंडळ स्थापन करावे व त्याला एक हजार कोटी रूपये देण्यात यावे व त्यातुन आर्थिक,शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणा कमी करा ही आमची मागणी आहे.आम्ही आमचे सर्व हक्क घेऊत ओ बी सी प्रवर्गासाठी असलेल्या सवलतीचा लाभ काही ठरावीक जातींना मिळत आहे.त्यामुळे मुळ आणि ख-या ओ बी सी वर अन्याय होत आहे.
यानंतर अध्यक्षीय भाषणात पांडुरंग कुंभार यांनी केंद्र सरकारने न्या.जी रोहणी आयोगाची त्वरीत अमलबजावणी करावी हि आमची प्रमुख मागणी आहे.जातनिहाय जणगनना झाली पाहिजे,राजकीय आरक्षण दिले पाहिजे.त्यासाठी ओ बी सी आयोगाची स्थापणा करून न्यायालयात इंपेरिकल डाटा सादर करावा व ओ बी सी राजकीय आरक्षण मिळवावे अशी मागणी केली.याप्रसंगी संतोष हंबीरे,रवि कोरे आळणीकर,लक्ष्मण माने,डी एन कोळी,कल्याण कुंभांर आदिंची भाषणे झाली.तेली समाजाचे कळंब शहराध्यक्ष अशोक चिंचकर,शहाजी माने,बालाजी पवार,अंकुश गायकवाड,शुभम कदम,रविराज खंडेराव,हरीदास जाधव,बाळासाहेब कुंभार,नाना पवार,गोकुळ बरकसे,दत्ता शेवडे,बापु सुरवसे,अरूण जाधवर,बाळू पौळ,महेश इटकर,बाबा कुंभार,रमेश कुंभार,अरूण मुंडे,सचिन गायकवाड,बबन हौसलमल,मस्के नाना,मुन्ना मंडाळे,गोकुळ मंडाळे,आदिंची उपस्थिती होती.यांच्यासह सर्व जातीचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.