
परंडा (राजकीय कट्टा प्रतिनिधी)आज ह.भ.प.शिवाजीराव मोरे महाराज देहुकर (संत तुकाराम महाराजांचे वंशज)यांनी मा.आ.सुजितसिंह ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली, यावेळी जिल्ह्यातील पालखी मार्गावर वृक्षारोपण व संगोपन याबाबत सविस्तर चर्चा केली.
जिल्ह्यातील वनराईचे प्रमाण केवळ 1% आहे हे प्रमाण दरवर्षी वाढविण्यासाठी नियोजनबद्ध उपक्रम राबविण्याचे ठरले,या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्यासाठी आमदार सुजित सिंग ठाकूर यांनी सर्वप्रकारचे सहकार्य करण्याचे वचन महाराजांना दिले.
याप्रसंगी मा.आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी महाराजांचे शाल पुष्पहार व श्रीफळ देऊन स्वागत केले.यावेळी सुबोधसिंह ठाकुर समरजितसिंह ठाकूर विकास कुलकर्णी ह.भ.प.बालाजी महाराज बोराडे हे उपस्थित होते.