उस्मानाबाद (राजकीय कट्टा प्रतिनिधी) जिल्हा विधिज्ञ उस्मानाबादच्या वतीने श्रीमती पूजा ओंकार सुतार यांना उदरनिर्वाहासाठी मदत म्हणून पिको फॉलची अत्याधुनिक शिलाई मशीन देण्यात आली. श्रीमती पूजा सुतार यांच्या पतीचे कोरोनामुळे दुसऱ्या लाटेत निधन झाले होते. त्यांचे पती ओंकार हे व्यवसायाने वकील होते. या लाटेत ओंकार यांचे आई-वडील यांचाही करणामुळे मृत्यू झालेला होता, मंडळाने श्रीमती पूजा यांना स्वतःच्या पायावर उभे राहणे करता माणुसकीच्या भावनेतून ही मदत केलेली आहे.
यापूर्वीही जिल्हा विधिज्ञ मंडळ उस्मानाबाद यांनी बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या माध्यमातून एक लाख रुपयाची मदत पूजा सुतार यांना केलेली आहे तसेच विधिमंडळ त्यांना नोकरी मिळण्याकरिता प्रयत्न करत आहे. यापुढेही विधिमंडळ सुतार कुटुंबियांना मदत करणार आहे.
जिल्हा न्यायालय झालेल्या या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष अँड नितीन भोसले बार कौन्सिल महाराष्ट्राचे सदस्य मिलिंद पाटील, वरिष्ठ वकील राम गरड, पांडुरंग लोमटे, कैलास बागल, तसेच अतुल देशमुख, प्रसाद जोशी, प्रवीण शेटे, अमर जगताप, मारुती घोगरे, मंगेश वळसंगे, बी बी देशमुख विष्णू चौरे, महिला प्रतिनिधी अश्विनी सोनटक्के, आकांक्षा माने, अरुणा गवई व इतर वकील बांधव उपस्थित होते
मनसे, शिवसेना पाठोपाठ आता नाना पटोलेंसह प्रमुख नेते जाणार अयोध्या दौऱ्यावर
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केला असला तरी आता काँग्रेस नेत्यांनी अयोध्या वारी करण्याचा निर्धार केला...