उस्मानाबाद( राजकीय कट्टा प्रतिनिधी) भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे येथील आदित्य दत्तात्रय ढगे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी भूम यांच्याकडे एक तक्रार देत बाणगंगा नदीत वाळू उपसा सुरू असून वाळू तस्कर बबलू बागल यांच्या डंपरने ड्रायव्हर संतोष सावंत यांनी आदित्य ढगे व अनिल बेरड यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केली आहे.

या तक्रारीत आदित्य दत्तात्रय ढगे यांनी मौजे रोसंबा येथील गट नंबर 70 च्या शेताखालील अवैध वाळूचा उपसा उपसा करत असून जमीन मालकास गावात येऊन अनिल पोपट बेरड यास वैभव डोके (गोरेगाव), बबलू बागल (आष्टा) संतोष सावंत यांनी चिंचपूर ढगे येथे गावात येऊन हाणमार केली व जिवे मारण्याची धमकी दिली यांच्यापासून आमच्या कुटुंबास धोका असल्याची तक्रार दाखल केली आहे.

चिंचपूर येथील बानगंगा नदीतून वाळूउपसा होत असून दहशतीचे वातावरण तयार होत आहे असे या तक्रारीत म्हटले आहे. यावर गणेश दत्तात्रय ढगे,आदित्य दत्तात्रय ढगे,ऋषिकेश संभाजी सुरवसे, अनिल पोपट बेरड यांच्या स्वाक्षर्या आहेत .
वाळू तस्करांना नेमके अभय कोणाचे?
चिंचपूर ढगे येथील बानगंगा नदीतून अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून कोणत्याही प्रकारची कार्यवाही तलाठी, पोलीस पाटील,तहसीलदार हे करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा व्यवसाय अगदी जोरत सुरू आहे. चिंचपूर ढगे गावातील काही लोकांना हाताशी धरून वाळू तस्कर हे आपला व्यवसाय बेमालूमपणे करत आहेत यावर प्रशासन काही कारवाई करणार की नाही हा प्रश्न सध्या पडला आहे.