
मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.

या राजीनामा पत्रामध्ये त्यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी त्यांच्याकडे अॕड.जयश्री पाटील यांच्या द्वारा दाखल याचिकेमध्ये आज दिनांक ५ एप्रिल२०२१ रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआयमार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्या अनुषंगाने मी पदावर राहणे मला नैतिक दृष्ट्या योग्य वाटत नसल्याचेही या राजीनामा पत्रामध्ये म्हटले आहे. मी स्वतःहून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असून मला गृहमंत्री पदावरून कार्यमुक्त करावे अशी विनंती करणारे पत्र त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे.
त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रीपदचा राजीनामा देणारे अनिल देशमुख दुसरे मंत्री आहेत मागील महिन्यातच पूजा चव्हाण प्रकरणांमध्ये राज्याचे वनमंत्री तथा शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी देखील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता तर मागील काही दिवसापासून सचिन वाझे व इतर प्रकरणात अनिल देशमुख शही राजीनामा देणार अशी चर्चा माध्यमात होती यांचीही चर्चा राजीनामा देणार अशी होत होती.