राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वतीने आयोजित केली होती काव्यस्पर्धा
उस्मानाबाद (राजकीय कट्टा प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वतीने काव्यवाचन स्पर्धा आयोजित केली होती.

या स्पर्धेत एकूण 74 जणांनी सहभाग घेतला यामध्ये मलेशिया व न्यूयॉर्क या देशातून देखील कवितेचे व्हिडीओ प्राप्त झाले होते. या काव्य स्पर्धेतील 74 व्हिडिओ मधून परीक्षण करून प्रसिद्ध कवी हनुमंत पडवळ यांनी तीन विजेते निवडले. या मध्ये 50% लाईक व 50% कवितेच्या व्हिडिओचे परीक्षण करून तीन विजेते निवडले.सर्व सहभागी कवी-कवयित्री यांना प्रमाणपत्र देखील देण्यात आले.

प्रथम क्रमांकाचे 10 हजार रुपयाचे पारितोषिक कुमारी करिष्मा मुलानी यांनी मिळविले तर पाच हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक प्रणव शेवाळे यांनी पटकावले आहे तर तीन हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक अभिजीत शिंदे यांनी मिळविले आहे. यासोबतच ट्रॉफी प्रमाणपत्र देखील देण्यात आले.कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा ऑनलाइन पद्धतीने पार पडलेला आहे. तसाच याचा बक्षीस वितरण सोहळा देखील ऑनलाइन पद्धतीनेच पार पडला आणि प्रत्येक विजेत्या स्पर्धकाला त्यांचे पारितोषिक त्यांच्या बँक खात्यावर जमा तर ट्राफी व प्रमाणपत्र कुरियर द्वारे त्यांना घरपोच पाठवण्यात आले. तर सहभागी कवी कवयित्री यांना त्यांचे प्रमाणपत्र ई-मेल द्वारे पाठवण्यात आले.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ.वेदप्रकाश पाटील सोशल फाउंडेशन उस्मानाबाद व स्वराज्य चित्रपट संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र टाचतोडे व त्यांच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले.