उस्मानाबाद(राजकीय कट्टा प्रतिनिधी) समाजात अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणारे कलाकार आहेत मात्र मिमिक्री करणाऱ्या कलाकारांची संख्या म्हणावी तेवढी नसते त्यातच काही जणांना ते वरदान मिळतं तर काहीजण ते सरावाने प्राप्त करून घेतात. ही कला प्राप्त केलेल्या एका व्यक्तीपैकी म्हणजे चिंचपूर ढगे ता. भूम येथील वकील म्हणून प्रसिद्ध असणारे तसेच प्रगतशील शेतकरी ॲड.संदीप ढगे-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करता येते.त्यांनी अनेकवेळा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेवेळी खासदार शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल व भाषण करत कार्यकर्त्यांची मने जिंकली आहेत.
त्यासोबतच माजी मंत्री व बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल,केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, यांचाही आवाज ते हुबेहूब काढतात.या आवाजाची नक्कल त्यांनी अनेक वेळा अनेक स्टेजवर केलेली आहे.ते व्यवसायाने वकील असून भूम येथील जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करतात या क्षेत्रातही त्यांनी आपला नावलौकिक वाढवला आहे.

ते स्वतः एक प्रगतशील मेहनती शेतकरी देखील आहेत. चिकाटी,साहस व मेहनत या गुणांच्या बळावर आज ते स्वतः प्रसिद्ध आहेत. त्यांनी भूम जिल्हा व सत्र न्यायालयाचे अध्यक्षपद देखील भूषवले असून या काळात भूम न्यायालयामध्ये अनेक सोयी सुविधा मिळाव्यात,वकिलांना विविध अधिकार मिळावेत यासाठी तत्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देखील निवेदन देऊन या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते. याबद्दल आजही भूम न्यायालयातील वकील बांधव ॲड.संदीप ढगे पाटील यांच्याबद्दल भरभरून बोलताना दिसून येतात .

अशा या विविधांगी व्यक्तीचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय कट्टाच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा.
ॲड.संदीप ढगे पाटील यांनी काढलेल्या आवाजाच्या नकलाच्या लिंक टच करा आणि ते कशा पद्धतीने आवाज काढतात पहा...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आवाजाची नक्कल पाहण्यासाठी खालील लिंक टच करा..
बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल यांच्या आवाजाची नक्कल पाहण्यासाठी खालील लिंकला टच करा.
भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या आवाजाची नक्कल पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा