उस्मानाबाद-जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये एकूण 15 जागेपैकी महाविकास आघाडीने 15 पैकी 15 जागा जिंकत उस्मानाबाद डीसीसी बँकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजपाला डीसीसी बँकेत आपले खाते देखील खोलता आले नाही असे असले तरी आता चेअरमन नेमका कोण होणार? हा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडला आहे.
शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांचे प्रत्येकी 5 संचालक निवडून आले आहेत.यामध्ये चेअरमनपद नेमकं कोणाला मिळणार व व्हाईस चेअरमन कोण होणार हा प्रश्न देखील सध्या उपस्थित होत आहे. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता चेअरमनपद हे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे तिघेही वीस महिने वाटून घेतील व तो फॉर्म्युला व्हाईस चेअरमन पदासाठी देखील असेल अशीही चर्चा आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान चेअरमन सुरेश बिराजदार,मधुकर मोटे संजय कांबळे,संजय पाटील आरसोलीकर व प्रवीना कोलते हे पाच सदस्य निवडून आले आहेत. तर काँग्रेस कडून बापूराव पाटील,अपेक्षा आष्टे, मेहबूब पाशा पटेल, नागप्पा पाटील व सुनील चव्हाण हे पाच सदस्य निवडून आले आहेत तर शिवसेनेकडून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, बळवंत तांबारे,नानासाहेब पाटील व केशव सावंत
संजय देशमुख हे पाच सदस्य निवडून आले आहेत. यामध्ये चेअरमनपदाची लॉटरी कोणाला लागेल ही देखील चर्चा सध्या सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरेश बिराजदार व मधुकर मोटे यांच्यापैकी एक चेअरमन पदाचा उमेदवार असू शकतो तर काँग्रेसकडून बापुराव पाटील व सुनील चव्हाण चेअरमन पदाचे उमेदवार असू शकतात तर शिवसेनेतून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील,संजय देशमुख, नानासाहेब पाटील हे चेअरमन पदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.
यामध्ये नेमकं कोण चेअरमन होईल हे आताच सांगणे शक्य नसलं तरी देखील वेळोवेळीच्या अपडेट राजकीय कट्टाच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत.
आपल्याला काय वाटतं कोण चेअरमन होणार ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका