उस्मानाबाद (प्रतिनिधी) : 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती व राजमाता जिजाऊ साहेब यांची जयंती दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. या दिनाचे औचित्य साधून कृषि महाविद्यालय आळणी येथे राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील हे होते.यावेळी महाविद्यालयाचे प्रा.के.डी.बंडे प्रा.बुरगुटे के.ए.,गुरव,पि.के.यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य क्रांतीकुमार पाटील विद्यार्थ्यांना म्हणाले की,आपल्या देशाची संस्कृती जपली पाहिजे.आजच्या युवकांनी थोर महापुरुषांची आत्मचरित्र अभ्यासली पाहिजेत.थोर पुरुषांच्या अनुभवातून त्यांनी जी तत्त्वे जगापुढे मांडली त्याच्यावर आजच्या तरुणाने चिंतन करून ती आत्मसात व आचरणात आणण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना त्यांनी राजमाता जिजाऊ यांचा इतिहास तसेच शिवरायांना घडवण्यात असलेली त्यांची कामगिरी याबद्दल विवेचन केले.स्वामी विवेकानंदाबद्दल बोलताना त्यांनी आजच्या युवकापुढील आव्हाने, व्यसनाधीनता, आपले राष्ट्र महासत्ता होण्यासाठी युवकांची भूमिका काय असली पाहिजे व युवावस्थेतील ऊर्जा हि समजोपयोगी सकारात्मक कामे करावीत याबद्दल मार्गदर्शन केले.

महाविद्यालयीन विद्यार्थी सुमित गंगथडे नदीम शेख ,प्रवीण पाटील तसेच विद्यार्थिनी अपेक्षा चोबे,राऊत निकिता, ढोकळे शुभांगी व आचल जांगिड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बुरगुटे के.ए.यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. एस.एन.पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा.साबळे मॅडम , प्राध्यापक साठे,प्रा.नागरगोजे, प्रा.खताळ,प्रा.गायकवाड, प्रा. पवार, प्रा.गारडी,प्रा.जगधाने, प्रा.वाकळे मॅडम,प्रा.पठाण मॅडम महाविद्यालय प्रशासन प्रमुख प्रा. हरी घाडगे कार्यालय कर्मचारी राम सुतार,मेहबूब मुजावर ,प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.