बहरला तरुणाईचा अंतरंग, दरवळला कृषि मृदगंध….
उस्मानाबाद : प्रतिनिधी, विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्ती व त्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या दिनाचे व उत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी नेहमी अग्रेसर असणारे कृषी महाविद्यालय आळणी गड पाटी येथे शिवजयंतीनिमित्त “मृदगंध वेध अंतर्मनाचा” या सदरा अंतर्गत युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग व प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता. स्पर्धेचे उद्घाटन आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेने झाले तर डॉक्टर वेदप्रकाश पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन पटलावरील विविध पैलू अभ्यासपूर्वक विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवले. विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती व आपल्या गौरवशाली ईतिहासाप्रति जिज्ञासा वाढविण्याचा मनोदय लक्षात घेऊन इतिहासाचा अभ्यास करताना व इतिहास समजून घेत असताना इतिहासकारांनी लिहून ठेवलेली साहित्यसंपदा, पत्रे, विविध भेटी विषयक लेख, व मनोगत या सर्व लेखिक साधनांचा समन्वय कसा साधावा हे उलगडून सांगितले. आपल्या अमोघ वक्तृत्त्वातून त्यांनी विद्यार्थ्यांसमोर शिवचरित्र उभे केले.

‘मृदगंध-वेध अंतर्मनाचा’ या शिव सप्ताहानिमित्त कृषि युवक महोत्सवांमध्ये विविध स्पर्धांचे व दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धा आयोजित करतेवेळी आयोजकांनी विद्यार्थ्यांचा मनोरंजन व शैक्षणिक प्रगतीच्या अनुषंगाने विविध युवा पैलुचा व कौशल्याचा विचार करून आयोजन केलेले दिसून आले; यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन, गीत गायन, फूड स्टॉल, पथनाट्य, मूक अभिनय, पोस्टर प्रेझेंटेशन, चित्रकला, रांगोळी, सीड आर्ट, फ्रुट कार्विंग आणि क्रिकेट इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त व हिरीरीने भाग घेतला त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी व अंतरंगातील दडलेल्या नाट्यछटा व आनंद लहरीचा उलगडा होण्यासाठी बॉलीवूड डे, पारंपारिक वेशभूषा, ट्विंस डे, गॉगल डे, इत्यादी दिनांचे आयोजनही करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी फ्रुट कार्विंग , सीड आर्ट व बॉलीवूड डे चे आयोजन करण्यात आले होते. फ्रुट कार्विंग दिवशी विद्यार्थ्यांनी फळावर कोरलेले नक्षीकाम मन वेधून घेणारे होते; त्यामध्ये स्नेहा शिरसागर हिने साकारलेली खरबुज फळावरील कमळ, व्यावसायिक हॉटेल्समध्ये मांडावेत असे फळाचे सलाड व आणखी विविध कलाकृतींनी अव्वल स्थान मिळवले व आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली तसेच योगिता गवळी हिने आपली कल्पकता वापरून कलिंगडावरील ब्लॅक पर्ल या प्रवासी जहाजाचे साकारलेले नक्षीकाम पाहिल्यानंतर सर्वांना पायरेटस ऑफ कॅरिबियन या हॉलीवुड चित्रपटाची आठवण झाली. विद्यार्थ्यांनी साकारलेली बदक, टोमॅटो व कलिंगडावरील गुलाब हेसुद्धा स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले व व्यवसायिक नक्षी काराला लाजवेल अशा स्वरूपाचे कौशल्य विद्यार्थ्यांनी यातून दर्शविले.

‘Seed Art’ स्पर्धेसाठी प्रस्तुत करण्यात आलेली धान्यांच्या बियापासून बनवलेली कोंबडी व तिची पिल्ले यांनी अव्वलस्थान मारले तर या समवेत पर्यावरण वाचवण्यासाठी वृक्षसंवर्धन संदेश देणारी हिरव्या धान्यातून साकारलेले पृथ्वी व वृक्षाचे प्रतिकृती सर्वांना वृक्ष संवर्धनाविषयी सामाजिक संदेश देऊन गेले तर महाराष्ट्र राज्याचे जिल्हानिहाय धान्य उत्पादन दर्शवणारा बियाणांचा नकाशा सर्व विद्यार्थ्यांना सहज लक्षात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल ही कल्पकता वाखाणण्याजोगी होती.

पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धेअंतर्गत यादव दर्शन व मोरे अंकिता यांनी सेंद्रिय शेतीची गरज या विषयी आपल्या भित्ती पत्रका मधून सेंद्रिय शेतीबाबत जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला व वैष्णवी माळी हिने कृषी यांत्रिकीकरणावर जोर देण्यासाठी ड्रोन्स या विषयावर भित्तीपत्रक सादर केले.
मोबाईल वापर आजच्या युगामध्ये जीवनावश्यक गरजांमध्ये समाविष्ट झालेले आहे असे असतानाच करोना प्रदूर्भावा च्या काळात शिक्षण हे सुद्धा मोबाईलच्या माध्यमातूनच मिळाले. त्यातील त्रुटी, त्या मुळे झालेले दुष्परिणाम व त्यांच्या शिक्षणावर पडलेला परिणाम,मोबाइल अति वापरामुळे होणारा आरोग्य व सामाजिक नात्यावर होणारे दुष्परिणाम सादर करण्याचा सुंदर असा प्रयोग मूक अभिनयामार्फत कृषी महाविद्यालयात शिकत असणाऱ्या दुसऱ्या वर्षातील कृष्णाइ इनामदार, पाटोळे प्रतीक, रोहन हिरेमठ, नोमान शेख व शिंदे मृणाली या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर रित्या सादर केला व त्यातून ऑफलाइन शिक्षण का महत्त्वाचे आहे यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच इनामदार कृष्णाई, शिंदे मृणाली व मोरे अंकिता या मुलींनी वाढते व वृद्धाश्रम व त्या वृद्धाश्रमात वाढणारे वृद्धांची संख्या यावर प्रकाश टाकण्यासाठी नाटक सादर केले व त्यातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न यावेळी विद्यार्थ्यांनी केला.
रांगोळी स्पर्धेमध्ये शेतकरी आत्महत्या विषयक प्रबोधन करणारी माने स्वप्नाली हिची ‘मला जगू द्या,मी सर्वांना जगवेल’ अशा आशयाची शेतकरी वास्तव मांडणारी रांगोळी सर्वांच्या काळजामध्ये शेतकऱ्यांविषयी आस्था निर्माण करणारी होती तर प्रतीक्षा गायकवाड हिच्या रांगोळी मधून एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश यावेळी सर्वांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. इनामदार कृष्णाई व शिंदे मृणाली यांनी साकारलेल्या बैलजोडी व शेतकऱ्यांमधील जिव्हाळा, प्रेम यांच वास्तव दर्शन करणारी प्रतिकृती स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरल्या तर पाणी वाचवा, मृदसंधारण, पैठणी साडी वरील मोर, भारतीय विविधतेतून एकता दर्शवणारे रांगोळी यांनी मन मोहून घेतले.

युवक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरला तो खवय्येगिरासाठी अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे खाद्यपदार्थांची मेजवानी, महाविद्यालय प्रांगणामध्ये खवय्यांसाठी विद्यार्थ्यां मार्फत विद्यार्थ्यांनी आयोजित केलेली ‘फूड स्टॉल’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी यावेळी पावभाजी, दाबेली, मशरूम पकोडे, पालक पकोडे, पुलाव, भेळ, पाणीपुरी इत्यादी पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतला व आगळ्यावेगळ्या चहाची चव घेतल्यानंतर कोल्हापुरी पान खाऊन तृप्तीची ढेकर दिली. या स्पर्धा आयोजित करण्यामागे विद्यार्थ्यांमधील व्यवसायिक दृष्टीकोण यायला पाहिजे हा मुख्य हेतू ठेवून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त जाहिरात, स्वच्छता, मांडणी इत्यादी बाबी मूल्यमापनामध्ये काटेकोर पडताळण्यात आल्या.

बॉलिवूड दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी अवघी मायानगरीच महाविद्यालयात अवतरल्याचा आभास निर्माण केला. पि. के. चित्रपटातील आमिर खान, शोले चित्रपटातील बसंती, जोधा-अकबर चित्रपटातील जोधा-अकबर, इत्यादी बॉलीवूड भूमिका या दिनाच्या आकर्षण ठरल्या तर नाना पाटेकर,मकरंद अनासपुरे दादा कोंडके इत्यादी नटाच्या आवाज सदृश्य भूमिका विद्यार्थ्यांनी साकारल्या व कृषी क्षेत्रातील विद्यार्थी अभिनय क्षेत्रातही सरस आहेत याचा प्रत्यय दाखवून दिला. पारंपरिक वेशभूषा दिनानिमित्त जोधा अकबर च्या वेशभूषेत आलेली जोधा-अकबर बसंती,;शेतकरी व सोबत कारभारीन, बंगाली वेशभूषा, राजस्थानी घागरा, तेलंगणा पेहराव, महाराष्ट्राची नऊवारी, दक्षिण भारतीय पेहरावात असलेली लक्ष्मी, तर कोळी समुदायात यातील महिलांची वेशभूषा साकारून आलेल्या विद्यार्थिनींनी महाविद्यालय प्रांगणामध्ये विविधतेने नटलेल्या भारतभूचे दर्शन घडवून आणले.
आयोजनात नसतानाही दुपारच्यावेळी मध्ये रंगलेली काव्य मैफिल व गीत गायन यामुळे तरुणाईने बहरून गेलेले महाविद्यालय प्रांगण म्हणजे कवीच्या कल्पनेतील स्वर्गच असल्याचे भासले. क्रिकेट स्पर्धांमध्ये द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अंतिम सामना जिंकून ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरणा सोबतच ‘शेलापागोटे’ या गोड गुलाबी टिपणी देणाऱ्या कार्यक्रमा सोबत संपूर्ण सप्ताहाचे सांगता झाली या दिवशी सर्व स्पर्धांमध्ये सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले विविध स्पर्धांमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. ते पुढील प्रमाणे….
चित्रकला स्पर्धा
अवताडे वैष्णवी- प्रथम क्रमांक
शिंदे मृणाली- द्वितीय क्रमांक सिंधू प्रिया- तृतीय क्रमांक
पोस्टर प्रेझेंटेशन
यादव दर्शन- प्रथम क्रमांक
मोरे अंकिता- द्वितीय क्रमांक वैष्णवी माळी- तृतीय क्रमांक.
रांगोळी स्पर्धा
माने स्वप्नाली-प्रथम
इनामदार कृष्णाई व शिंदे मृणाली द्वितीय क्रमांक
गायकवाड प्रतिक्षा -तृतीय क्रमांक
सीड आर्ट
एम सिंधुप्रिया- प्रथम क्रमांक क्षीरसागर स्नेहा-द्वितीय क्रमांक मोरे अंकिता-तृतीय क्रमांक.
फ्रुट कार्विंग
क्षिरसागर स्नेहा- प्रथम क्रमांक गवळी योगिता-द्वितीय क्रमांक धनगर सागर- तृतीय क्रमांक
फूड स्टॉल
गवळी योगिता व स्नेहल मोरे प्रथम क्रमांक
मते अकांक्षा, चोबे अपेक्षा व वाघमारे प्रतीक्षा -द्वितीय क्रमांक वाघमारे रत्नाई, पडवळ कीर्ती- तृतीय क्रमांक.
फ्रुट कार्विंग
शिरसागर स्नेहा -प्रथम
गवळी योगिता -द्वितीय
धनगर सागर -तृतीय
सांस्कृतिक कार्यक्रम
गवळी योगिता- प्रथम
द्वितीय वर्ष विद्यार्थी समूह- द्वितीय
जांगिड आंचल- तृतीय
याप्रकारे पारितोषिक वितरण झाले. या कार्यक्रमासाठी आयोजक समिती वर प्राध्यापक गुरव पी. के., सुतार एन एस., दळवे एस.एन., भालेकर एस. व्ही., बुरगुटे के. ए., शेटे डी. एस., खताळ एस. एस., गायकवाड पी. के., गार्डी ए. जी., जगदाने एस., साठे एम पी., नागरगोजे व्ही. व्ही., प्राध्यापिका पाटील एस. एन., पठाण आर. एस., साबळे एस. एन., वाकळे ए. जी., व कांबळे अक्षय यांनी कामगिरी बजावली. कार्यक्रमाची रूपरेषा आखणी आणि नियोजन प्राध्यापक के. डी. बंडे यांनी केले, तर महाविद्यालय प्राचार्य डॉ क्रांतिकुमार पाटील व महाविद्यालय प्रशासक घाडगे हरी यांनी विशेष सहकार्य केले.
या सप्ताहाच्या यशस्वी होण्यामागे सत्रातील विद्यार्थ्यांनी स्वच्छता समिती नियंत्रण समिती आयोजक समिती इत्यादी समित्या निर्माण केल्या होत्या व आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली तसेच महाविद्यालयातील इतर कर्मचारी यांनी देखील कामगिरी बजावली व बहरलेला सप्ताह संपन्न झाला.
या कार्यक्रमाप्रसंगी विविध स्पर्धेस उपस्थित असलेले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,इंदिरा गांधी विश्वविद्यालय विद्यापीठ रायपूर चे माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश जी पाटील साहेब,डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल चे संस्थापक मार्गदर्शक डॉ. प्रतापसिंह पाटील,डॉ. स्मिता शहापुरकर,श्री. मंगेश निपाणीकर, उद्योजक श्री. तुळशीदास जमाले, इतिहास संशोधक श्री. केतन पुरी, महाराष्ट्र संघाचे अंडर-१९ अभिषेक पवार,डॉ. सुरज मोटे, आकाश तावडे,प्रशांत वीर,प्रतिक्षा पवार,रजनी टकले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.