(परंडा राजकीय कट्टा प्रतिनिधी) आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीतून मौजे कुक्कडगांव ता. परंडा येथे प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहुर्तावर सकाळी 11:30 वा आर.ओ. प्लँट (जलशुध्दीकरण प्रकल्प) चे भुमीपुजन मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांचे सुपुञ युवा नेते समरजीतसिंह ठाकूर यांचे शुभहस्ते सपन्न झाले.

यावेळी अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड.जहीर चौधरी, जिल्हा उद्योग आघाडी आध्यक्ष मा.हनुमंत पाटील, ता. सरचिटणीस विठ्ठल तिपाले, सो. मि. ता. अध्यक्ष निशिकांत क्षीरसागर, आनाळा सरपंच जोतीराम क्षीरसागर, भोंजा सरपंच शरद कोळी, हिगंणगाव सरपंच महेश औसरे, ॲड. लक्ष्मन कोकाटे, साहेबराव पाडूळे, पोपट सुरवसे, रामा खरात, भाऊसाहेब पाटील, चांगदेव चव्हाण, अरूण चोपडे सर, राजेंद्र खरात, राजेंद्र साळूंके, वायसे सर, नामदेव वायसे, जोतिराम क्षिरसागर कुक्कडगांव, दिनेश ताकमोडे बालाजी पाटूळे, शंकर साळूंके, रावसाहेब कांबळे, पिनु बरकडे, माधव महानवर, बबन खुरूंगे सुभाष खरात, नेताजी वाघमारे, अशोक कांबळे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रास्ताविक ॲड.तानाजी वाघमारे, जिल्हा सरचिटणीस, भाजपा ओबीसी मोर्चा यांनी केले तर सुञसंचालन कुक्कडगांवचे सरपंच आमीर शेख यांनी केले व आभार प्रदर्शन देवराव वायसे सर यांनी केले.