कळंब (राजकीय कट्टा प्रतिनिधी)
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मराठवाडा विभागाच्या वतीने १३ वे छत्रपती संभाजीराजे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे .
छत्रपती संभाजीराजे मराठी साहित्य संमेलन पुरंदर, सासवड व पुणे या ठिकाणी घेण्यात आले होते. छत्रपती संभाजीराजे यांचा जाज्वल्य व खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचावा या करीता हे संमेलन आयोजित करण्यात येते. छत्रपती संभाजीराजे यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकणारे लेखक, कवी व वक्ते यांचा संमेलनात विशेष गौरव केला जातो. दिनांक १९ डिसेंबर २०२१ रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन कळंब येथील येरमाळा – बार्शी रोडवरील पर्याय संस्था च्या सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार कैलास घाडगे पाटील असणार आहेत. तर उद्घाटक पदी ज्येष्ठ साहित्यिक लेखक चित्रपट निर्माते शरद गोरे असणार आहेत.
या संमेलनात उद्घाटन, परीसंवाद, कवीसंमेलन व पुरस्कार वितरण असे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत अशी माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे, मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर यांनी दिली आहे.