
उस्मानाबाद(राजकीय कट्टा प्रतिनिधी)कळंब तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या 15 कोटी 66 लक्ष किमतीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ.कैलास पाटील यांच्या हस्ते संपन्न.
दि. 31/05/2022 रोजी कळंब तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर रस्त्याचे 19 किमी अंतर असून त्यामध्ये खालील रस्त्याचा समावेश आहे.
- शिराढोण ते रायगव्हाण-जायफळ रस्ता किमी 0/00 ते 5/625 (कामाची किंमत 4 कोटी 29 लक्ष)
- बोरवंटी येथील रामा 208 ते बोरवंटी-कोथळा-हिंगणगाव रस्ता किमी 0/00 ते 4/600
(किंमत 3 कोटी 50 लक्ष)
- नागझरवाडी येथील रामा 241 नागरझरवाडी ते तालुका हद्द रस्ता किमी 0/00 ते 6/680
(किंमत 5 कोटी 50 लक्ष)
- उपळाई येथील राज्य मार्ग 52 ते उपळाई-संजीतपुर रस्ता किमी 0/00 ते 3/075 (किंमत 2
कोटी 32 लक्ष)

या रस्त्यांचे भुमीपुजन खा.ओम राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या हस्ते व माजी नगराध्यक्ष श्री. मकरंद राजेनिंबाळकर व शिवसेना तालुकाप्रमुख श्री. शिवाजी कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
याप्रसंगी राजेश्वर पाटील, बाळासाहेब माकोडे, अजय समुद्रे, प्रदीप मेटे, सचिन काळे, सागर बाराते, लिंबराज शितोळे, सभापती वाघे, दत्ता आवाड, किसन भिसे, राजाभाऊ आगरकर, रफिक पठाण, अविनाश खापे, मधुकर गुरुजी, महादेव मगर, सागर बाराते, मनोज घोगरे, रणजित साळुंखे, दौलतराव माने, अमोल पाटील, सोमनाथ मडके, महिपत शेळके, प्रशांत धोंगडे, सुरेश माने, नारायण माने, बाबासाहेब उगले, रामहरी मुंडे, बळवंत तांबारे, अमोल मुर्गे, नितीन पाटील, शंभू बिडवे, अवधूत पाटील, नेताजी जावळे, नेताजी चव्हाण, शहाजी आबा शेळके, कार्यकारी अभियंता, सुनीता पाटील, उपअभियंता अजरुद्दीन, कनिष्ठ अभियंता धस व नागरिक उपस्थित होते.