कळंब (राजकीय कट्टा प्रतिनिधी)
कळंब तालुक्यातील दहिफळ येथे काँग्रेस पक्षाच्या शाखेचे उद्घाटन व नुतन महिला तालुकाध्यक्षा अंजलीताई ढवळे यांचा जाहीर सत्कार समारंभ रविवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने दहिफळ येथे पक्षाच्या महिला काँग्रेस,फादर काँग्रेस,युवक काँग्रेस शाखेचे उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी शाखेच्या फादर काँग्रेसच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र भातलवंडे यांची निवड करण्यात आली तर महिला काँग्रेसच्या शाखा अध्यक्षा मीनाताई सुतार यांची निवड करण्यात आली व युवक काँग्रेसच्या दहिफळ शाखा अध्यक्षपदी अजित भातलवंडे यांची निवडी नंतर शाखा उद्घाटन कार्यक्रम करण्यात आला.

कार्यक्रमानंतर जाहीर सत्काराचा समारंभ करण्यात आला. या सत्कार समारंभात नूतन तालुका अध्यक्ष महिला आघाडी अंजलीताई ढवळे यांचा दहिफळ गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष अँड धीरज भैय्या पाटील उपस्थित होते.पाटील यांनी सर्व नुतन पदाधिकारी यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाप्रसंगी कळंब तालुक्यातून दहिफळ गावातून झालेल्या या क्रांतीची सुरुवात येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी अतिशय महत्त्वाचे असून काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देणारी आहे.

याप्रसंगी तालुका अध्यक्ष पांडुरंग कुंभार यांनी येणाऱ्या काळात गाव तेथे काँग्रेस पक्षाची शाखा स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला.तर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष खलील सर यांनी केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाईच्या संदर्भात विविध दाखले देत केंद्र सरकार सामान्यांची कशी हे सांगितले. जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने यांनी ही विचार व्यक्त केले.
जिल्हा उपाध्यक्ष ज्योती सपाटे पाटील यांनी ही महागाई विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला. कळंब शहर कार्याधक्ष सचिन गायकवाड यांची ही उपस्थिती होती
तर तालुका अध्यक्ष अंजलीताई ढवळे यांना येणाऱ्या काळात संपूर्ण तालुक्यामध्ये महिलांचं शाखा स्थापन करून महिला मेळावा घेण्याचा निर्धार व्यक्त केला.