
कळंब(राजकीय कट्टा प्रतिनिधी)-कळंब तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी २९ सप्टेंबर रोजी बलाई मंगल कार्यालयात या शिबिराचे आयोजन आ कैलास पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते.त्याचे उदघाटन तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश गोरे या दिव्यांग बांधवांच्या शुभहस्ते तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

उस्मानाबाद तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी ३० सप्टेंबर रोजी पवनराजे कॉम्प्लेक्स येथील समर्थ मंगल कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उदघाटन खासदार मा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर जी,नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर,तालुका प्रमुख सतीश सोमाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. मयूर काकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
अपंग बांधवांचे जीवन सुखकर व्हावे तसेच आपले आयुष्य त्यांनी सक्षमपणे जगावे यासाठी शासन स्तरावर अनेक योजना राबवल्या जातात, दिव्यांग बांधवांचे जीवनस्तर उंचावण्यासाठी शासन स्तरावर राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा फायदा जिल्ह्यातील अपंगांना व्हावा यासाठी, यापुढेही शिबिरांचे आयोजन करण्यात येईल, असा विश्वास उपस्थित अपंग बांधवांना आ कैलास पाटील यांनी दिला.
यावेळी शिवसेना,युवासेना पदाधिकारी,शिवसैनिक उपस्थित होते