आ.कैलास घाडगे पाटील संमेलनाचे स्वागताध्यक्ष, इतिहास संशोधक शरद गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन तर प्रा.डॉ.सतीश कदम संमेलनाध्यक्ष
कळंब (राजकीय कट्टा प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मराठवाडा विभागाच्या वतीने 13 वे छत्रपती संभाजीराजे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीराजे मराठी साहित्य संमेलन पुरंदर, सासवड व पुणे या ठिकाणी घेण्यात आले होते. छत्रपती संभाजीराजे यांचा जाज्वल्य व खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचावा या करीता हे संमेलन आयोजित करण्यात येते. छत्रपती संभाजीराजे यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकणारे लेखक, कवी व वक्ते यांचा संमेलनात विशेष गौरव केला जातो. दिनांक 19 डिसेंबर 2021 रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन कळंब येथील येरमाळा – बार्शी रोडवरील पर्याय संस्था च्या सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले आहे.
या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार कैलास घाडगे पाटील असणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक लेखक चित्रपट निर्माते शरद गोरे असणार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिद्ध इतिहास संशोधक व साहित्यिक डॉ सतीश कदम यांची निवड झाल्याची माहिती साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर यांनी दिली आहे.
संमेलन उद्घाटन समारंभास विशेष अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे प्रदेशाध्यक्ष फुलचंद नागटिळक, भारतीय जनता पार्टीचे कळंब तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, शिवसेनेचे कळंब तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, सिने अभिनेने सुनील साबळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
परिसंवादात तज्ज्ञ मान्यवरांचा सहभाग
संमेलनात छत्रपती संभाजी महाराज – जीवन कार्य या विषयावर येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. संदीप तांबारे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. यात नवनाथ गायकर, प्रा.डॉ.दादाराव गुंडरे, प्रा.डॉ.केदार काळवणे यांचा सहभाग राहणार आहे.
यांचा पुरस्काराने होणार सन्मान
संमेलनात पर्याय सामाजिक संस्थेचे सचिव विश्वनाथ तोडकर यांना छत्रपती संभाजी महाराज समाजगौरव पुरस्कार, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के. पी. पाटील यांना छत्रपती संभाजी महाराज शिक्षणरत्न तर ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा.भास्कर चंदनशिव यांना छत्रपती संभाजी महाराज साहित्य जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
जिजाऊ संस्थेचे पुरस्कार
जिजाऊ बहुद्देशीय संस्था पुरस्कााराचेही संमेलनात वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार – सौ. सुमन धनराज जाधवर, स्वामी विवेकानंद युवा कार्यगौरव पुरस्कार – रणजित महादेव देशमाने, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार सौ.प्रतिभा बाळकृष्ण भवर-गांगुर्डे, राजर्षि शाहू महाराज सामाजिक कार्य गौरव पुरस्कार – शिवाजी शहाजी कराळे, राजा रवी वर्मा कलागौरव पुरस्कार – राजकुमार दत्तात्रय कुंभार, बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार – माधवसिंग राजपूत तर छत्रपती शिवाजी महाराज समूह सामाजिक कार्य गौरव पुरस्कार शिवाई प्रतिष्ठान कळंब यांना देऊन गौरविण्यात येणार आहे.
संमेलनाचा समारोप संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.सतीश कदम यांच्या अध्यक्षतेखाली व उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, युवा सेनेचे राज्य विस्तारक अविनाश खापे, पीपल्स रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अनिष शेख यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
कविसंमेलनाची मेजवानी
संमेलनामध्ये आयोजित कविसंमेलनात नामवंत कविंच्या साहित्याची मेजवानी श्रोत्यांना मिळणार आहे. या कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ बाळकृष्ण भवर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच जनजागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक गौतम सिरसट यांच्या विशेष उपस्थितीत होणार्या कविसंमेलनात संजय मुंदडा, कुलदीप रुघे, संतोष लिमकर, सौ.अलका टोणगे, राजेंद्र टाचतोडे, रमेश बोर्डेकर, के.व्ही. सरवदे, यशवंत चंदनशिवे (लोहारा), अनिल आगलावे (तुळजापूर), युवराज गायकवाड (उमरगा), भूमिपुत्र वाघ, सौ.ज्योती सपाटे, युवराज जगताप, शशिकला गुंजाळ, संतोष चव्हाण, शेखर गिरी, सोपान पवार, सचिन क्षीरसागर, डॉ.दत्ता साकोळे, दीपक सूर्यवंशी, नागनाथ पाटील, योगीराज पांचाळ, कोमल पाखरे, मधुकर हुजरे, अरविंद हंगरगेकर, विशाल वाघमारे, अरूण गिरी हे कवी सहभागी होणार आहे.तरी या संमेलनात सारस्वतांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन परीषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे, मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर, लातूर विभागीय अध्यक्ष बालाजी सुरवसे, जिल्हाध्यक्ष अशोक कुरुंद, तालुकाध्यक्ष अश्रूबा कोठावळे यांनी केले आहे.