कळंब (राजकीय कट्टा प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टी कन्हेरवाडी यांच्या तर्फे विद्या विकास हायस्कूल कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी रोख स्वरूपात रक्कम व चांदीचे पेन देऊन सर्व विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. प्रथम आलेली विदयार्थी दिव्या मच्छिंद्र कवडे 95% द्वितीय अनुजा तुकाराम गायकवाड 93%, तृतीय श्रेया चंद्रकांत कवडे 92% यांच्यासह विशेष प्राविण्य प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचां पालकासमवेत सत्कार करण्यात आले..तसेच सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला

यावेळी आयोजक कन्हेरवाडी गावचे उपसरपंच विजय ऊर्फ सोनू कवडे,भाजपा तालुका चिटणीस राजेंद्र मिटकरी, नेताजी कवडे,उमेश गायकवाड, शिवाजी कवडे, धर्मराज कवडे, विवेकानंद मिटकरी सर, वसुदेव सावंत, प्रा.संजय मिटकरी, डॉ.बाबुराव कवडे,अशोक कवडे, लालासाहेब कवडे, उदय मोरे,संजय सावंत, संजय कवडे ,संग्राम जाधव यांच्या सह गावातील नागरिक,पालक, विदयार्थी, शालेय समिती सदस्य, व शालेय स्टाफ उपस्थित होते.