मुंबई : कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात काही कंपन्या ग्राहकांची लूट करताना दिसून येत आहे. त्यात ग्राहकांना वेगवेगळ्या अमिश दाखवून सर्रास लुटण्याचा प्रयत्नही होताना दिसून येत आहे. अशातच ओ-लाइन-ओ ही कंपनी सुद्धा नागरिकांना जास्त नफा देण्याच आमिष दाखवून लुटण्याचा प्रयत्न करत आहे अशी तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेचे अध्यक्ष सतीश नारकर यांच्या पर्यंत संघटनेच्या सभासदाकडून पोहचली होती.
याच पार्श्वभूमीवर आज दुपारी मनसे टेलिकॉम संघटनेचे अध्यक्ष सतिश नारकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र विद्यार्थीं सेनेचे उपाध्यक्ष अखिल चित्र यांच्या नेतृत्वाखाली ओ-लाइन-ओ कंपनीच्या घाटकोपर येथील कार्यालयावर मनसेने धडक मोर्चा दिला होता. यावेळी संख्या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या संसर्गाचे नियम पाळून आंदोलन केले होते.
यावेळी अखिल चित्रे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने कंपनीच्या पधाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. तसेच घाटकोपर पोलीस स्थानकात कंपनीच्या विरोधात तक्रार दिली होती. आज एकीकडे सामान्य माणूस कोरोनाच्या संसर्गाने आणि बेरोजगारीमुळे हतबल झालेला असताना ओ-लाइन-ओ कंपनी लोकांना अमिश दाखवणे, झटपट लॉटरी आशा जुगारी वृत्तीसाठी नागरिकांना प्रवृत्त करत आहे अशा कंपनीला आळा घालण्यासाठी मनसे टेलिकॉम संघटना मैदानात उतरली आहे. तसेच कंपनीला धडा शिकवण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले होते.