उस्मानाबाद (राजकीय कट्टा प्रतिनिधी)– राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा कोरोना तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील खात्यावरून ची माहिती दिली आहे.


काही दिवसांपूर्वीच राज्याचे पर्यावरण मंत्री तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा ही तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे ते सध्या ग्रह विलगीकरणात आहेत.
आता यानंतर राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख पाटील हे देखील कोरोना पॉझिटिव आल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त मंत्र्यांची संख्या एकने वाढली आहे. राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील,जितेंद्र आव्हाड ,धनंजय मुंडे,एकनाथ शिंदे या प्रमुख मंत्र्यांशिवाय अनेक आमदार व मंत्र्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.आता यानंतर उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख पाटील यांची देखील त्यात भर पडली आहे.