कळंब (राजकीय कट्टा प्रतिनिधी)– पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीविरोधात केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दि.२० ऑक्टोबर रोजी कळंब येथे भव्य निदर्शने करून तहसीलदारांना निवेदन देवून निषेध व्यक्त केला.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,केंद्रातील भाजप सरकारने सत्तेत येण्याअगोदर पेट्रोल, डिझेल दरवाढीचा प्रमुख मुद्दा प्रचारात आघाडीवर ठेवला होता. मात्र भाजपाची सलग दोन वेळा देशात सत्ता ठेवून ही नागरिकांना अच्छे दिन पहावयास मिळाले नाही.वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्व सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागलेली आहे.त्यामुळे एक जागरूक आणि युवक संघटना या नात्याने दरवाढीविरोधात अहिंसक पध्द्तीने निषेध नोंदविण्यात येत आहे.

यावेळी राष्ट्रवादी छ.शिवाजी महाराज चौक ते तहसीलदार कार्यालय निदर्शन करत घोषणा देत लोकजागृती केली.
या निवेदनावर राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस तारेख मिर्झा,प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंतनू खंदारे,वक्ता सेल प्रदेश उपाध्यक्ष प्रा.तुषार वाघमारे, युवक तालुकाध्यक्ष पद्माकर पाटील,शहराध्यक्ष रणजित खोसे,राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष भीमा हगारे,अमर मडके कार्याध्यक्ष नितीन वाडे,उमेश मडके,उपाध्यक्ष हुजेब बागवान,तालुका सरचिटणीस आफताब तांबोळी, राहुल कसबे यांच्या स्वाक्षर्या आहेत.